
महाराष्ट्रात (Maharashtra) गणशोत्सव (Ganeshotsav 2019) मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दरम्यान गणेश मूर्तीची स्थापना करुन 10 दिवस पूजा केली जाते. गणेशोत्सवाचा आज गुरूवारी शेवटचा दिवस असून गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहेत. घरात अथवा सार्वजनिक मंडाळात १० दिवसापूर्वी स्थापित झालेला बाप्पा सर्व भाविकांचा निरोप घेणार आहे. गणपती बाप्पा मोरया...,पुढच्या वर्षी लवकर या... (Ganpati Bappa Morya) असे बोलत गणेशाचे विसर्जन केले जाणार जाते. मुंबईतील सर्वात लोकप्रिय बाप्पा लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) हा देखील सर्व गणेश भक्तांचा निरोप घेणार आहे. गणेशोत्सव दरम्यान लालबागच्या राजाचा दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. नवसाला पावणारा गणपती अशी ओळख मिळवणारा लागबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी केवळ मुंबईकरच (Mumbai) नव्हे तर, मुंबईच्या बाहेरूनदेखील अनेक भाविक आवर्जून येत असतात.
मुंबईत लालबागचा राजा हा एकमेव गणपती आहे. ज्याचे दर्शन घेण्यासाठी 8 ते 10 तास रांगेत उभा राहावे लागते. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मंडळाकडून दोन रांगा विभाजून देण्यात आल्या आहेत. एकीकडे मुख दर्शनाची रांग लावली जाते तर, दुसरीकडे नवसाची रांग तयार करण्यात आली आहे. लालबागच्या राजाचे नवसाच्या रांगेतून दर्शन घेण्यासाठी तब्बल 25 ते 30 तास रांगेत उभा राहावे लागते. दिवसात किमान 5 ते 6 वेळा लालबागच्या राजाची आरती केली जाते. लालबागच्या राजाचा दर्शनासाठी केवळ सामान्य लोक येत नसून सिनेमातील मोठे कलाकार, राजकीय नेत्यांसह दिग्गज खेळाडूदेखील येतात. परंतु इच्छा असूनही काही कारणास्तव लालबागच्या राजाचे दर्शन न घेता आल्यामुळे काही भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. अशा भाविंकासाठी आनंदाची बातमी आहे. लालबागच्या राजा मंडळाच्या सोशल मीडिया पेजेस वरून तुम्हाला थेट बाप्पाचे दर्शन घेता येऊ शकते. यामध्ये फेसबूक, ट्वीटरसह युट्युब चॅनल आणि अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून अनेकजण लालबागच्या राजाचे दर्शन घेऊ शकतात.
इथे पहा लालबागच्या राजा आरती व मुखदर्शनाचे लाईव्ह स्ट्रीमिंग
इथे पहा लालबागच्या राजा आरती व मुखदर्शनाचे लाईव्ह स्ट्रीमिंगलालबागच्या राजाचं लाईव्ह मुखदर्शन मंडळाच्या अधिकृत युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे.दिवसातून दोन वेळेस लालबागच्या राजाची आरती होते. बुधवारी रात्री 12 वाजता लालबागच्या राजाचे दर्शन बंद करण्यात आले आहे. लागबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन केले जाते. दरम्यान गिरगाव चौपाटीवर भाविकांचा मोठ्या संख्येत जमाव पाहायला मिळतो.