International Day of Families 2019: 'आंतरराष्ट्रीय परिवार दिवस' का साजरा केला जातो? एकत्र कुटूंब पद्धती किती प्रभावशाली?
International Day of Families 2019 (Photo Credits: Pixabay)

International Day of Families 2019 Date, Significance &Theme: 15 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय परिवार दिवस (International Day of Families) म्हणून साजरा केला जातो. एकत्र कुटूंब पद्धती ही भारतीय संस्करांचा एक भाग आहे. आपल्या यश-अपयशामध्ये, स्वभावामध्ये आपल्या कुटुंबाचा कळत नकळत प्रभाव पडत असतो. आजकाल धकाधकीच्या बनत चाललेल्या आपल्या जीवनशैलीमुळे विभक्त कुटुंबपद्धती वाढत चालली आहे. प्रत्येक गोष्टीचे काही फायदे तोटे असतात. कुटूंब हा केवळ आपला आधार नसतो त्याचा आपल्या मानसिक, शारिरीक आरोग्यावरही परिणाम होत असतो. म्हणूनच आजच्या दिवशी कुटूंबाचं महत्त्व जाणून घ्या आणि मगच तुमचा पुढचा निर्णय घ्या. यंदाचीची थीम Families and Climate Action: Focus on SDG13 अशी आहे.

# आंतरराष्ट्रीय कुटूंब दिनाचं औचित्य साधून आज तुमच्या कुटूंबासोबत एकत्र वेळ घालावा.

# आपला स्वभाव आणि जडणघडणीमध्ये आपलं कुटूंब एक महत्त्वाची भूमिका बजावते.

# अनेकदा संकटांचा सामना करण्यासाठी तुमचं कुटूंब तुमच्या पाठीशी असेल तर अनेकदा मोठ्या धैर्याने त्याचा सामना करता येऊ शकतो.

# कातरवेळ म्हनजेच संध्याकाळची वेळ ही एकट्याने काढणं अनेकदा सरता सरत नाही. यामधून मनात अनेकदा नकारात्मक भाव येतात. तुलनेत एकत्र कुटूंबात राहणार्‍यांमध्ये असे नकारात्मक भाव कमी येतात. तुम्ही आनंदी राहता.

# नैराश्यसारख्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या आजाराला दूर ठेवण्यासाठी वैद्यकीय मदतीसोबतच तुमच्या घरातल्या व्यक्तींचा आधारही तितकाच महत्त्वाचा आहे. नैराश्याची लक्षणं त्या व्यक्तीपेक्षा त्यांच्या जवळच्या व्यक्तीला लवकर कळतात. त्यामुळे एकत्र कुटूंबात राहणं फायदेशीर आहे.

# जबाबदारी वाटून घेण्याची आणि सार्‍यांशी जुळवून घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी एकत्र कुटूंब पद्धती मदत करते. यामध्ये एकत्र कुटूंबात राहिल्यास विविध स्वभावाच्या लोकांशी कसं जुळवून घ्यायचं याचे संस्कार आपोआपच घरात होतात.

1993 सालपासून संयुक्त राष्ट्र 15 मे यादिवशी जागतिक परिवार दिन साजरा करतो. जगभरात या दिवशी कुटूंबाचं महत्त्व पटवून देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.