Sex Addiction: सेक्सच्या अहारी गेलेल्या लोकांबद्दल महत्त्वाची निरिक्षणं
Sex Addiction । (Photo credit: archived, edited, and only symbolic images)

सेक्सचे व्यसन (Sex Addiction) हा शब्द आपण अनेक वेळा ऐकला असेल. काहींच्या बाबतीत कदाचित तो लागू असेन. आपल्यापैकी अनेकांना हेसुद्धा महिती असेल की, सेक्स जीवनातील आनंद आणि उर्जा टिकविण्यासाठी महत्त्वाचा आहे. परंतू, याच सेक्सचा अतिरेक झाला की त्याचे रुपांतर सेक्सच्या व्यसनात होते आणि कोणतेही व्यसन हे वाईटच. सेक्स एक्सपर्ट्सकडे येणाऱ्या अनेक केसेसमध्ये सेक्स अॅडिक्ट (Sex Addict) झालेल्या लोकांच्या तक्रारी अधिक प्रमाणावर असतात. सेक्स अॅडिक्शनबद्दल धक्कादायक माहिती देणारे हे सहा मुद्दे.

  • अनेक सेक्स एक्सपर्ट सांगतात की, सेक्सच्या अहारी गेलेले अनेक लोक हे बायपोलर डिसऑर्डर या प्रकाराचे शिकार झालेले असतात. हे लोक सातत्याने सेक्स या विषयाबाबतच विचार करतात. त्यांना अशाच अॅक्टीविटी करण्यात फार इंटरेस्ट असतो. जो धोकादायक ठरु शकतो.
  • सेक्सच्या अहारी गेलेल्या काही लोकांच्या केसेसमध्ये अनेकदा आढळून येते की हे लोक त्यांच्या बालपणी लैंगिक शोषणाचे शिकार ठरलेले अतात. सेक्स एक्सपर्ट सांगतात की हे लोक त्यांच्यावर बालपणी झालेला अन्याय आणि स्वप्नांचा बदला घेऊ इच्छितात.
  • एक्सपर्ट्स सांगतात की, जे लोक एस्पर्गर सिंड्रोम ने ग्रस्त असतात त्यांच्यातही सेक्स संबंधी विचार आणि कृती करण्याचे प्रमाण अधिक असते.
  • अनेकदा ड्रग्ज किंवा अंमली पदार्थांचे सेवन करण्याच्या आहारी गेलेलेल लोकही सेक्स अॅडिक्ट झालेले दिसतात. या प्रकारातील लोक हे सेक्सला एक व्यसनाचा पर्याय म्हणून पाहतात. (हेही वाचा: भरपूर सेक्स करूनही का राहतात स्त्रिया असंतुष्ट? कदाचित पुरुषांकडून होत असतील 'या' चुका)

वाचकांसाठी महत्त्वाची सूचना अशी की, वरीलपैकी कोणतेही लक्षण आपल्यात दिसले तरी लगेच आपण सेक्स अॅडिक्ट झालो असे समजू नये. आपल्या मनात तशी भावना निर्माण झाली असल्यास वेळीच तज्ज्ञ मार्गदर्श, डॉक्टर्सचा सल्ला घ्या. इथे दिलेली माहिती ही विविध सेक्स एक्स्पर्ट्सनी दिलेल्या माहिती आणि अनुभवावर असली तरी ती ढोबळमानाने दिलेली असते. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळी लक्षणे, उपाय आणि प्रकार असू शकतात. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला केव्हाही इष्ट.