जागतिक हास्य दिन Photo Credits : Pixabay

अनुवांशिकतेने अनेक गोष्टी मिळत असल्या तरीही दोन स्माईल्स कधीच एक सारख्या असू शकत नाहीत. प्रत्येकाच्या स्माईलमध्ये काही विशेष असतं. 5 ऑक्टोबर हा दिवस जागतिक स्माईल दिवस म्हणून साजरा केला जातो. मग पहा केवळ एका स्माईल मागे किती गोष्टी दडलेल्या असतात.   World Smile Day : या सेलिब्रेटींच्या हास्याने जिंकली प्रेक्षकांची मने !

एन्डॉरफिन रीलिज होते -

हसणं आरोग्यदायी असतं असं म्हटलं जातं. कारण जेव्हा आपल्या चेहर्‍यावर हास्य येतं तेव्हा एन्डॉरफिन हार्मोन्सचा स्त्राव होतो. हे हार्मोन्समुळे मूड सुधारतो.

रक्तदाब कमी -

एन्डॉरफिन हार्मोन्समुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. प्रामुख्याने उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी हा उत्तम नैसर्गिक उपाय आहे.

19 प्रकारच्या स्माईल्स -

journal Psychological Reportsने दिलेल्या माहितीनुसार स्माईल्स या 19 विविध प्रकारच्या असू शकतात. साधं हास्य ते अगदी खदखदून हसण्यापर्यंत वेगवेगळे असू शकतात.

चेहर्‍याचा व्यायाम -  

हसणं हा चेहर्‍याच्या व्यायामापैकी एक आहे. केवळ एका स्माईलमुळे चेहर्‍यावरील 26 स्नायूंचा व्यायाम होतो. त्यामुळे चेहर्‍याच्या जॉ लाईनपासून चेहर्‍याच्या स्नायूंना मजबूत करण्यासाठी मदत होते.