Heart Disease(Photo Credits: Archived, edited, symbolic images)

हृदय (Heart) हा मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव. इंजिनच म्हणा ना थोडक्यात. त्यामुळे तंदुरुस्त हृदय (Healthy Heart) प्रचंड आवश्यक असते. आजच्या धावपळीच्या आयुष्यात हृदयाकडे लक्ष द्यायला अनेकांना वेळच नसतो. त्यामुळे लोकांना हृदयविकार नावाचा आजार होतो. या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे या आजारात हृयविकाराचा धक्का (Heart Attack) येतो आणि वेळीच उपचार नाही मिळाले तर व्यक्तीचा मृत्यू होण्याची अधिक शक्यता असते. म्हणून हृदयाची काळची (Heart Care) आवश्यक. आज जागतिक हृदय दिन (World Heart Day 2021) . त्यामुळे जाणून घेऊया त्या 10 गोष्टी. ज्या हृदयविकाराचे कारण ठरु शकतात. या 10 गोष्टींमध्ये प्रामुख्याने धूम्रपान, चरबीयुक्त आहार, डायबिटीज, हाई कॉलेस्ट्रोल, हाई ब्लड प्रेशर आणि लठ्ठपणा हार्ट या गोष्टी येतात. तसेच, कॉफी, Sexआणि Migraine यांसारख्या गोष्टींबाबतही काळजी आणि योग्य माहिती घेण्याची आवश्यकता आहे.

अपूरी झोप: तुम्ही कोणतेही काम करा. कोणत्याही क्षेत्रात असा. कामासाठी उर्जा पुरविण्याच्या बदल्यात शरीराला योग्य आहार आणि पुरेशी झोप आवश्यक असते. कमीत कमी रात्रीची 6 ते 7.50 तास झोप गरजेचीच आहे. अभ्यासक सांगतात की जे लोक 6 तासापेक्षा कमी झोप घेतात त्यांना हृदयविकार होण्याचे प्रमाण 6 ते 8 तास झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत अधिक असतो. कमी झोपेमुळे रक्तदाब वाढतो तसे इन्फ्लेमेशनची समस्याही वाढते. (हेही वाचा, Heart Attack: कमी वयात हृदयविकाराचा धोका कसा टाळाल? कार्डिओलॉजिस्टकडून जाणून घ्या 'या' काही महत्त्वाच्या टीप्स)

मायग्रेन- ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास असतो त्यांना स्ट्रोक, छातीत दुखणे, हृदयविकार अशा गोष्टींची शक्यता अधिक असते. जर कोणाला हृदयाचा आजार आणि मायग्रेन अशा दोन्ही समस्या असतील तर मायग्रेनची औषधे घेताना तज्ज्ञ डॉ़क्टरांचा सल्ला अधिक आवश्यक आहे.

थंड वातावरण: थंड हवामानात किंवा वातावरणात राहणाऱ्या लोकांच्या धमण्या काहीशा पातळ होत जातात. ज्यामुळे शरीरात होणाऱ्या रक्तपुरवठ्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे शरीराच्या वेगवान हलचालींवर मर्यादा येते असे अभ्यासक सांगतात.

अधिक आहार- काही लोकांना खूप प्रमाणात आहार घेण्याची आवश्यकता असते. त्यामुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन नोरएपिनेफ्रीन रिलीज होते. हे उच्च रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढविण्याचे कारण ठरतो. त्यामुळे व्यक्तीस हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. काही लोक अधिक चरबीयुक्त आहार घेतात. त्यांच्यातही शरीरातील चरबी अधिक वाढल्यामुळे हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यात असते.

ताण-तणाव: प्रचंड प्रमाणात ताण-तणाव, अधिकचा राग, एखाद्या गोष्टीचा मनाला लागणारा चटका हे देखील हृदयाशी संब्ंधित त्रास निर्माण करतात. त्यामुळे प्रमाणापेक्षा अधिक आनंद अथवा दु:ख, किंवा ताण तणाव हृदयविकाराचे कारण ठरु शकतात.

एक्सरसाइज: व्यायाम हा नेहमीच शरीरासाठी आवश्यक असतो. परंतू, अतिप्रमाणात व्यायाम करणे हेदेखील हृदयविकाराचे कारण ठरु शकते. कारण शरीराच्या क्षमतेपेक्षा व्यायाम जीवघेणा ठरल्याची अनेक उदाहरणे समाजात घडली आहेत. अभ्यासक सांगतात की जवळपास 6% हार्ट अॅटेक हे अतीप्रमाणात शारीरिक कष्ट, काम, व्यायाम केल्याने होतात.

सेक्स: खरेतर सेक्स ही अपवाद वगळता प्रत्येकाच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा घटाक. काही लोकांना सेक्स हा व्यायामासारखा करण्याची सवय असते. अशा वेळी एक्सरसाइज प्रमाणे केलेल्या सेक्सुअल एक्टिविटी या देखील हार्ट अॅटेकचे कारण ठरु शकतात. त्यामुळे जर आपल्याला हृदयाशी संबंधीत काही समस्या असतील तर सेक्स करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या.

कॉफी- अल्कोहोल प्रमाणेच कॉफीचेही काही फायदे आणि तोटे आहेत. कॉफीमध्ये कॅफीन नावाचा एक घटक अतो. जो आपला ब्लड प्रेशर अधि वाढवतो. अधिक प्रमाणात कॉफी पिल्याने व्यक्तीला हार्ट अॅटेक येऊ शकतो. अभ्यास सांगतात की दिवसातून दोन किंवा तीन कप कॉफी पिणाऱ्या व्यक्तीस फारसा धोका संभवत नाही. परंतू, ज्यांना दिवसातून पाच सहा कप कॉफी पिण्याची सवय असते त्यांना मात्र धोका संभवतो.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)