Cancer Day | File Image

कॅन्सर (Cancer) या आजाराचं नाव ऐकूनच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते त्यामुळे या आजाराशी दोन हात करून त्यावर मात करण्यासाठी अनेकदा रूग्णाला वैद्यकीय मदतीसोबत मानसिकरित्या देखील कणखर रहावं लागत. आज हा दुर्धर आजार जगात सर्वत्रच आबालवृद्धांमध्ये सर्रास आढळत आहे. कॅन्सर बद्दल समज-गैरसमज देखील अनेक असल्याने त्याच्या उपचरांसोबतच अनेक उपक्रम हे त्याच्याबद्दल सजगता वाढवण्यासाठी देखील केले जातात. आज वर्ल्ड कॅन्सर डे च्या दिवशी कॅन्सर वर मात केलेल्यांना आणि सध्या कॅन्सरशी लढत असलेल्यांना मानसिक बळ देण्यासाठी खास प्रेरणादायी विचार, Quotes शेअर करत या दिवशी त्यांचं जगणं अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करा.

कॅन्सरचं वेळीच निदान झालं तर या आजारावरही मात करणं अगदीच शक्य आहे. आज औषधोपचार आणि निदान पद्धतीमध्येही विकास झाला झाल्याने लवकर कॅन्सर फ्री होणं शक्य आहे. पण त्यासाठी रूग्णाच्या मानसिक तयारीची आणि सकारात्मक उर्जेची देखील त्याला जोड असणं आवश्यक आहे. नक्की वाचा: कर्करोग बरा होतो का? 'जागतिक कर्करोग दिना'निमित्त जाणून घ्या भारतात होणाऱ्या 5 सामान्य कर्करोगाच्या प्रकाराविषयी.

जागतिक कर्करोग दिवस

Cancer Day | File Image
Cancer Day | File Image
Cancer Day | File Image
Cancer Day | File Image
Cancer Day | File Image

 

बदलत्या आणि अधिक वेगवान झालेल्या लाईफस्टाईल मध्ये आता अनेक आजारांना आपणच कळत नकळत आमंत्रण देत आहोत. कॅन्सर हा देखील त्यापैकीच एक आजार आहे. या आजारात अनेक वेदनादायी उपचार पद्धती असल्याने रूग्णासोबतच त्याच्या परिवारालाही खंबीरपणे उभं राहणं आवश्यक आहे.