Red Bull काय आहे आणि ते प्यायल्याने काय होते? जाणून घ्या अधिक
Red Bull (Photo Credits-Twitter)

सध्या बाजारात विविध कंपन्यांचे सॉफ्ट ड्रिंक्स आपण खरेदी करतो. त्यात थम्स अप असो किंवा स्प्राइट यामधून बहुतांश जणांना थोडावेळसाठी तरतरी आल्यासारखे वाटते. अशातच तुम्ही कधी रेड बुल (Red Bull) प्यायला आहात का? त्याची चव तुम्हाला माहिती आहे का? असे विविध प्रश्न प्रथमच पिणाऱ्या व्यक्तीकडून विचारले जातात. खरंतर रेड बुल हे सुद्धा एक सॉफ्ट ड्रिंकच आहे. त्यामुळे रेड बुल प्यायल्याने नक्की काय होते या बद्दलच आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत. त्यानुसार तुम्ही ठरवू शकता ते आरोग्यासाठी योग्य आहे की अयोग्य. चला तर जाणून घ्या रेड बुल प्यायल्याने नक्की काय होते.

रेड बुल मध्ये कॅफीन टॉरिन आणि साखरेचे प्रमाण सर्वाधिक असते. यामुळे रेड बुल प्यायल्यानंतर तुम्हाला काही वेळ उर्जा आणि तरतरी जाणवते. या व्यतिरिक्त काम करताना आलेली झोप किंवा आळसपणा काही वेळासाठी नाहीसा होते. परंतु रेड बुलची जी टॅगलाईन आहे Red Bull Gives You Wings हे मात्र खरं नाही आहे. कारण कंपनीने त्यांचा रेड बुलच्या सॉफ्ट ड्रिंकचा ब्रँन्ड अधिकाधिक लोकांनी विकत घेऊन त्याकडे आकर्षित व्हावे यासाठीच त्या पद्धतीची टॅगलाईन दिली गेली आहे.(Benefits Of Drinking Water by Sitting: बसून पाणी पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या सविस्तर)

आणखी एक मुख्य गोष्ट म्हणजे रेड बुल हे जगातील सर्वाधिक विक्री केले जाणारे एनर्जी ड्रिक असून त्याचे दरवर्षी 630 कोटींपेक्षा अधिक कॅनची विक्री केली जाते. त्याचसोबत असे नेहमीच म्हटले जाते की, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करु नये. कारण एखाद्या गोष्टीचे व्यसन ज्यावेळी आपल्याला लागते त्याचे दुष्परिणाम सुद्धा आपण पाहतोच. तर रेड बुल बाबत सुद्धा असे काहीसे आहे.

रेड बुल रोज एकापेक्षा अधिक प्यायल्यास चिडचिड, निद्रानाश, उच्च रक्तदाब, हृदयाचे ठोके वाढणे, अस्वस्थता, चिंता, लघवीचे प्रमाण वाढणे, उलटी होणे, चक्कर येणे किंवा मळमळ वाढणे असा त्रास तुम्हाला होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा रेड बुलचा तुमच्या दैनंदिन जीवनात अधिक वापर करत असाल तर वरील काही गोष्टी जरुर लक्षात ठेवा.