भारतीय सण उत्सव हे पकवान्नांशिवाय अपुर्ण आहेत. सण म्हटलं की, मित्रांना, जवळच्यांना भेटणे आलेच. त्यांनतर खाणे-पिणे आणि नाचणे-गाणे तर होतेच. पण याच गडबडीत आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. त्यामुळेच सणांच्या आनंदावर, उत्साहावर पाणी फिरु नये म्हणून काही विशिष्ट्य गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. सणांच्या काळात आरोग्याचा या समस्या डोके वर काढू लागतात... आरोग्याचं गणित सांभाळत नवरात्रीत उपवास कसा कराल ?
डायरिया आणि उलटी
नवरात्रीत उपवास नसलीत तर खूप सारी मिठाई आणि पकवान्न खाल्ले जातात. यामुळे फूड पॉयजनिंग, डायरिया, उलटी किंवा पोटाचे इंफेक्शन यांसारख्या समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे खाण्यावर नियंत्रण ठेवा.
अस्थमा
फटाक्यांमुळे होणारी धूळ, धूर यामुळे अस्थमाच्या रुग्णांना त्रास होतो. त्याचबरोबर डोळ्यांना त्रास होऊ शकतो.
सर्दी आणि ताप
जंक फूडच्या अति सेवनाचा थेट परिणाम रोगप्रतिकारकशक्तीवर होतो. गर्दीच्या ठिकणी अनेकांच्या सान्निध्यात आल्यामुळे इंफेक्शनचा धोका वाढतो. त्यामुळे हेल्दी पदार्थांचे सेवन करा आणि भरपूर पाणी प्या.
जखम/वेदना
गरबा, दांडीया खेळताना काही लागण्याची, जखम होण्याची शक्यता असते. त्याचबरोब अनेकांना स्लिप डिस्क, गुडघेदुखी, नसा आखडणे यामुळे वेदनांना सामोरे जावे लागते.
डिहायड्रेशन
सणांच्या सेलिब्रेशनमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष नको. धावपळीत, गडबडीत डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. मूत्रविसर्जन करताना जळजळ होणे, लघवीचा रंग बदलणे ही डिहायड्रेशनची लक्षणे आहेत. त्याचबरोबर चिडचिड होणे, डोकेदुखी आणि थकवा यांसारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे भरपूर पाणी प्या. अनवाणी चालण्याचे व्रत करताना 'अशी' घ्या पायांची काळजी !