अशक्तपणा दूर करण्यासाठी आहारात समाविष्ट करा ह्या पाच गोष्टी
weakness image (Photo credits: Pixabay)

दिवसेंदिवस बदलत जाणारी आधुनिक लाईफस्टाईल आणि रोजचे धकाधकीचे जीवन ह्यामुळे सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात तसेच त्याच्या आहारात खूप बदल होत राहतात. ज्याचा परिणाम अनपेक्षितपणे आपल्या आरोग्यावर आणि शरीरावर होतो. रोजच्या धकाधकीचे जीवन त्यात असंतुलित आहार ह्यामुळे आपल्या खूप अशक्तपणा वाटतो, थकवा वाटतो. ह्याचे रुपांतर पुढे जाऊन मोठमोठ्या आजारांमध्ये होते. अशा वेळेला तुमचे डाएटही तुम्हाला कधी कधी धोका देते. त्यामुळे ह्या सर्वांवर रामबाण उपाय म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा 5 महत्वपूर्ण गोष्टी सांगणार आहोत, ज्यांचा तुम्ही रोजच्या आहारात वापर केला तर, तुम्हाला थकवा, अशक्तपणा यांसारख्या समस्यांपासून सुटका होईल. चला तर पाहूया कोणत्या आहेत ह्या 5 गोष्टी.....

1. केळी- केळी ह्या ब-याच समस्यांवर, आजारांवर महत्वपूर्ण असा उपाय आहे. केळ्याच्या प्रत्येक जातीत स्वत:ची अशी खास गुणधर्म आहेत. केळ्यात ग्लुकोज, सुक्रोज आणि फ्रुटोज शी महत्त्वाची सत्त्व आहेत. ज्याच्यामुळे आपल्याला ताकद मिळते. थकवा कमी होतो. मासिक पाळीमध्ये स्त्रियांनी केळ्याचे सेवन केल्यास मासिक पाळीत होणारा त्रास कमी होतो.

2. नारळ पाणी- नारळपाण्यामध्ये कार्बोहायड्रेट असल्यामुळे हे प्यायल्याने शरीराल ऊर्जा मिळते. तसेच त्यात व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम असल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित करता येते. तसेच तुम्हाला थकवा जाणवत असेल तर नारळ पाण्यातील इलेक्ट्रॉलाईट्स तुम्हाला ताजेतवाने ठेवण्यास मदत करतात.

3. डाळिंब- डाळिंबामध्ये भरपूर फायबर्स आणि व्हिटॅमिन्स असतात. ज्यामुळे शारिरीक थकवा कमी होतो. तसेच त्याचे लाल दाणे आपल्या शरीरातील रक्ताची मात्रा नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात.

4. टोमॅटो- टोमॅटोमध्ये असलेल्या व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन C चा उपयोग डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. तसेच शरीरातील थकवा दूर होतो. त्यामुळे रोज एक टोमॅटो जरी खाल्ला तरी शरीर निरोगी आणि सुरक्षित राहील. टोमॅटो आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करतो. टोमॅटोमध्ये केरोटीन नावाचे पोषकतत्व असते ज्यामुळे सांधेदुखी, अंगदुखी सारखा त्रास असेल तर तो कमी होतो.

5. आवळा- आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, जे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला आवळा असाच खाणे आवडत नसेल तर मुरांबाद्वारे तुम्ही त्याचे सेवन करु शकता. रोज आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने आपल्या शरीरातील थकवा दूर होतो.

Summer Tips: उन्हाळ्यात कोकम सरबत प्या, तंदुरुस्त रहा

जर तुम्हाला शरीरातील थकवा किंवा अशक्तपणा कमी करायचा असेल तर तुमच्या रोजच्या आहारात थोडा बदल करुन ह्या 5 गोष्टींचा आहारात समावेश केल्यास ह्या समस्येचे निराकरण होऊ शकते. तसेच तुम्हाला शरीराला नवीन ऊर्जा मिळून तुम्ही तुमच्या रोजच्या कामासाठी अगदी ताजेतवाने व्हाल. मग हा उपाय करुन पाहा आणि सुचवलेला हा उपाय कसा वाटला तो खाली दिलेल्या कमेंटबॉक्समध्ये कळवा

(सूचना: वरील आर्टीकलचा उद्देश हा माहिती देणे हा आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला  घेणे आवश्यक आहे.)