Google Doodle (Photo Credits-Google)

कोरोना योद्ध्यांना सलाम! Doodle:  गुगलकडून तयार करण्यात येणारे डुडल खास आणि लोकप्रिय असतात. गुगल नेहमीच कोणत्या ना कोणत्या महत्वाच्या गोष्टीसंदर्भात डुडल तयार करतेच. त्यामधून नागरिकांमध्ये जागृकता निर्माण करणे हे त्यामागील मुख्य उद्दिष्ट असते. अशातच आज सुद्धा गुगल कडून एक खास डुडल तयार करण्यात आले आहे. त्यानुसार डुडल मध्ये अशा कोरोना योद्धांना सलाम केला आहे जे कोरोनाशी लढा देत आहेत. म्हणजेच कोरोना वॉरियर्सचे गुगलने आज डुडलच्या माध्यमातून आभार मानले आहेत.

आजचे डुडल तुम्ही पाहिल्यास तुम्हाला Google च्या G अक्षराला पाय काढल्याचे दिसेल. नंतर O आणि G अक्षराच्या वरती लाल रंगांचे हृदय दिसेल. या व्यतिरिक्त अखेरचे अक्षर E ते पूर्णपणे बदलण्यात आले आहे. याच्या माध्यमातून गुगलने लिहिले आहे की, To All doctors, nurses and medical workers, thank you. जर तुम्ही गुगलवर क्लिक केल्यास तुम्हाला गुगल सर्च बारमध्ये thank you coronavirus helpers लिहिल्याचे एक नवे पेज सुरु होईल.(Earth Day 2021 Google Doodle: गुगलने खास डूडलच्या साहाय्याने दिल्या ‘अर्थ डे 2021’ च्या शुभेच्छा; उज्ज्वल भविष्यासाठी लोकांना झाडे लावण्यास केले प्रोत्साहित

Google Doodle (Photo Credits-Google)

गुगलने डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफ जे आपले सर्वस्वपणाला लावून लोकांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी झटत आहेत. या डुडलमध्ये डॉक्टरांसह मेडिकल कर्मचाऱ्यांच्या या कामासाठी सलाम करण्यात आला आहे.