Summer Hair care Tips: उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
Hair (Photo Credits: PixaBay)

उन्हाळ्यात जास्त उकाड्यामुळे घामाच्या धारांनी हैराण व्हायला होते. त्याचबरोबर केसांमध्येही उन्हाळ्यात सतत घाम येत असल्यामुळे खाज येते आणि सतत केस खाजवल्यामुळे त्यांची मुळे हलकी होतात आणि तुटतात. अशा वेळी केस गळण्याची समस्या जास्त निर्माण होते. त्यासोबतच केसांना उग्र वास येणे, केस कोरडे वा तेलकट होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. यामुळे या उन्हाळ्यात केसांची नीट काळजी घेणे फार गरजेचे आहे. केस धुताना तसेच धुतल्यानंतर त्यांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

उन्हाळ्यात आठवड्यातून दोनदा तरी केस धुतले पाहिजे. असे केल्यास केस चांगले राहतात. त्याव्यतिरिक्त काही घरगुती उपायांनी देखील केसांची निगा नीट ठेवता येईल. Summer Health Tips: उन्हाळ्यात अंगावर येणा-या घामोळ्यामुळे होणारा त्रास कमी करण्यास मदत करतील हे '5' नैसर्गिक उपाय

1. अंड्याचा पांढरा भाग केसांना लावावा. यामुळे केस मुलायम होतात.

2. बेसन, लिंबाचा रस आणि दही समप्रमाणात घेऊन केसांना लावल्यास केसांना चांगली चकाकी येते.

3. थोडं गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्यास केसांचा कोरडेपणी कमी होण्यास मदत होते.

4. उन्हाळ्यात कोमट पाण्याने धुवावे. गरम पाण्यामुळे केसांची मुळं हलकी होतात.

5. मेहंदी थंड असल्यामुळे उन्हाळ्यात 15 दिवसांनी केसांना मेहंदी लावावी.

उन्हाळ्यात केस घट्ट बांधणं टाळावं. यामुळे केस खराब होऊ शकतात आणि केसगळतीची शक्यताही वाढते. उन्हाळ्यात हवामानानुरुप हेअर स्टाईलच करावी. केसांची वेणी घालावी किंवा हलके वर बांधावेत.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)