Wrong Sitting Posture (Image Credit - Pixabay)

सध्याच्या धावपळीच्या युगात आपल्या कामाचा व्याप हा मोठ्या प्रमाणावर वाढला असून यामुळे आपली जीवनशैली देखील मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. तसेच घरुन काम करण्याची सवय यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. ऑफिसमध्ये आपल्याला तासन तास बसण्याची सवय आपल्याला आरोग्याला घातक ठरु शकते. कार्यालयात काम करताना आपल्यापैकी अनेक लोक लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर खुर्चीवर बराच वेळ बसून राहातात त्यामुळे आपल्या पाठीच्या कण्यावर परिणाम होतो. अनेकदा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे आरोग्याचे अनेक विकार जडतात.

बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक विकार आपल्याला जडू शकतात. कार्यालयात किंवा घरी दिवसभर एकाच जागी बसून काम करतात त्यांना अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. साधारणपणे या समस्या एकाच ठिकाणी बसून काम करणाऱ्यामध्ये अधिक प्रमाणात आढळून येतात.

1 पाठदुखी

कार्यालतात किंवा घरी जर तुम्ही कामाला चुकीच्या पद्धतीने बसत असाल खुर्ची तुम्हाला पाठीमागे आधार देत नसेल आणि तुम्ही आधार न घेता बसून राहिल्यास पाठ दुखू लागते आणि हे दुखणे मानेपासून सुरू होऊन मणक्याच्या हाडापर्यंत जाते.

2 लठ्ठपणा

आपण जर बराच वेळ एकाच जागी बसून राहिल्यास कोणतीही हालचाल न केल्यास तुमच्या शरीरातील चरबीचे प्रमाण वाढू लागते.

3 एकाग्रतेचा अभाव

जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने बसून खुर्चीवर काम करत असाल तर तुमची एकाग्रताही कमी होऊ लागते, कारण अस्वस्थपणे बसल्याने व्यक्तीचे लक्ष वारंवार त्याच जागेकडे जाते, त्यामुळे पाठ आणि हाताचा योग्य आधार घेऊन खुर्चीवर बसणे आवश्यक आहे.

4 खांदा दुखणे

अनेक लोक लॅपटॉपवर (Laptop) काम करतात आणि कीबोर्डवर बोटे सतत हलवतात, त्यांच्या हातापासून खांद्यापर्यंत वेदना सुरू होतात.

डिस्क्लेमर: सदर लेखातून फक्त सामान्य माहिती ही देण्यात आली असून अधिक तपशीलासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा