COVID 19 Vaccine घेणार्‍यांसाठी मोदी सरकारने दिली आहे 5000 रूपये जिंकण्याची संधी; mygov.in ला भेट देऊन तुम्हांला करायचं फक्त इतकंच काम!
Coronavirus Vaccine | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये सध्या कोरोना वायरसची दुसरी लाट प्रचंड धुमाकूळ घालत आहेत. दिवसागणिक वाढणारी रूग्णसंख्या सामान्यांना धस्स करणारी आहे तर आरोग्य यंत्रणांवर प्रचंड दबाव निर्माण करणारी आहे. पण सध्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेले एक शस्त्र म्हणजे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण. भारत सरकार कडून सध्या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यास सुरूवात झाली आहे. 1 मे पासून हे लसीकरण 18 वर्षांवरील नागरिकांनादेखील खुले केले जाणार आहे. त्यामुळे जनमानसात या लसीकरणाबाबत कोणताही किंतू परंतू न राहता अधिकाधिक लोकांनी लसीकरण करून घ्यावं यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी mygov.in या अधिकृत संकेतस्थळावर याकरिता कोरोना लसीकरणात सहभागी होत तुमचा फोटो पोस्ट करा आणि 5000 रूपये जिंकण्याची संधी मिळवा असे जाहीर केले आहे. Surgical Mask उलटा घातल्याने Corona Virus पासून बचाव होण्यास अधिक फायदेशीर असल्याचा दावा खोटा! जाणून घ्या तज्ञांचा सल्ला.

काय आहे कॉन्टेस्ट

mygov.in वर दिलेल्या माहितीनुसार, तुम्हांळा कोविड 19 साठी प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर या लसीकरणात सहभागी झाल्याचा एक फोटो आकर्षक टॅगलाईन सह पोस्ट करायचा आहे. टॅग लाईन ही इतरांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करणारी असली पाहिजे. तसेच लसीकरणादरम्यान कोविड 19 च्या नियमावलीनुसार तुम्ही मास्क घातलेला असला पाहिजे. दरम्यान 10 अशा बेस्ट टॅगलाईन्सला सरकारकडून 5000 रूपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. ही अनोखी कॉन्टेस्ट 31 डिसेंबर 2021 पर्यंत सुरू राहणार आहे. याकरिता तुम्ही किंवा तुमच्या परिवारातील कोणत्याही व्यक्तीचा फोटो पोस्ट करू शकता.

सध्या भारतामध्ये लसीकरण मोहिम वेगवान करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. कालच केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, आता 18 वर्षांवरील सार्‍यांना लस खुली करून देताना लसीच्या वाटपामधील निर्बंध देखील थोडे शिथिल केले आहेत.