Heart Attack (फोटो सौजन्य - File Image)

Rate of Heart Attack Increase On Mondays: गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचा धोका झपाट्याने वाढत आहे. दररोज हृदयविकाराच्या झटक्याने 9 मृत्यूची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. हृदयविकाराचा झटका कधीही येऊ शकतो, परंतु सोमवारी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. ब्रिटिश हार्ट फाउंडेशन (BHF) च्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, सोमवारी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका इतर दिवसांच्या तुलनेत 13% जास्त असतो. त्याचवेळी अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती आणि प्रसिद्ध कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. श्रीराम नेने (Cardiothoracic Surgeon Dr Shriram Nene) यांनीही सोमवारी सकाळी हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असल्याचे सांगितले आहे.

आकडेवारीनुसार, सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण इतर दिवसांपेक्षा जास्त आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, सोमवारी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 13% वाढतो. याला 'ब्लू मंडे' (Blue Monday) म्हणतात. नेमकं सोमवारीचं हृदयविकाराचा झटका येण्यामागचं कारण काय असेल? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला तर मग यागामागचं कारण जाणून घेऊयात. (हेही वाचा -Heart Attack: वीकेंडला जास्त झोपणे तुमच्यासाठी फायदेशीर, हृदयविकार होऊ शकतात दूर)

ब्लू मंडे म्हणजे काय?

असे मानले जाते की, सोमवारी सकाळी 6 ते 10 या वेळेत हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका सर्वाधिक असतो. मात्र, हा केवळ अंदाज असून त्यावर कोणताही ठोस अभ्यास झालेला नाही. डॉक्टर नेने यांच्या मते, तुम्ही सोमवारी सकाळी उठता तेव्हा रक्तातील कॉर्टिसोल आणि हार्मोन्स खूप जास्त असू शकतात. याचे कारण सर्काडियन लय असू शकते, जी आपली झोपेची आणि जागृत होण्याचे चक्र तयार करते. तज्ज्ञांच्या मते, झोप आणि जागृत होण्याच्या चक्रातील बदलांचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. (Young Girl Dies Of Heart Attack While Dancing: मेरठमध्ये हळदी समारंभात नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणीचा मृत्यू, धक्कादायक व्हिडिओ आला समोर)

सोमवारी सकाळी हृदयविकाराचा झटका का येतो?

डॉक्टर नेने यांच्या मते, बहुतेक लोक वीकेंडला उशिरा झोपतात. काही लोक चित्रपट पाहायला जातात तर काही लोक वीकेंडला पार्टी करतात. अशा स्थितीत रात्री झोपण्यास उशीर होणे आणि याचा सकाळी उठण्याच्या वेळेवर परिणाम होणे, हे एक मोठे कारण आहे. यामुळे तुमची सर्केडियन लय बदलते. रविवारी रात्री झोप न मिळाल्याने लोकांना 'सोशल जेट लॅग'चाही त्रास होतो. त्यामुळे रक्तदाब आणि कोर्टिसोलची पातळी वाढू लागते. जे हार्ट अटॅकचे प्रमुख कारण बनते.

(Disclaimer: हा लेख सामान्य माहितीसाठी आहे, कृपया कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)