Young Girl Dies Of Heart Attack While Dancing: मेरठमध्ये हळदी समारंभात नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणीचा मृत्यू, धक्कादायक व्हिडिओ आला समोर
Young Girl Dies Of Heart Attack While Dancing (PC - X/@SachinGuptaUP)

Young Girl Dies Of Heart Attack While Dancing: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठ जिल्ह्यातील एका तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला. ही तरुणी तिच्या चुलत बहिणीच्या हळदी समारंभात डान्स करत होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, मुलगी नाचताना आणि गाताना दिसत आहे. तसेच ती या दरम्यान अचानक एका मुलाचा हात पकडते आणि त्यानंतर लगेच जमिनीवर पडते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत मुलीला लगेच रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी तिला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत घोषित केले. या घटनेने मृत मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून लग्नाचे कार्यक्रम थांबवण्यात आले आहेत. (हेही वाचा -Heart Attack Patient's Miraculous Recovery: शस्त्रक्रियेशिवाय, आयुर्वेदिक थेरपीने बरा झाला हृदयविकाराचा रुग्ण; 90% ब्लॉकेजेस झाले कमी, जाणून घ्या सविस्तर)

येथे पहा व्हिडिओ -

यापूर्वी देखील अशा घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये लग्नात डान्स करताना हृदयविकारामुळे अनेकांचा जीव गेला आहे. सध्याच्या काळात हृदयविकाराच्या झटक्याची संख्या वाढत आहे. अगदी लहान मुलांमध्ये देखील हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण दिसून येत आहे. (Heart Attack Death: ह्रदयविकारमुळे होणाऱ्या मृत्यूचं कारण कोरोना? महत्वपूर्ण संशोधनातून धक्कादायक माहिती पुढे)

तरुणांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या घटना

यूपीच्या अमरोहा जिल्ह्यात अशाच एका घटनेत हृदयविकाराच्या झटक्याने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. रिपोर्ट्सनुसार, हा मुलगा त्याच्या मोबाईल फोनवर व्हिडिओ पाहत होता तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, अमरोहा येथील सैदंगली भागातील 16 वर्षीय दिलशाद कुरेशी हा 11 वीच्या वर्गात शिकत होता.