प्राण मुद्रा म्हणजे काय? जाणून घ्या लाभ आणि फायदे
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

प्राण मुद्रा (Pran Mudra)म्हणजे योगासना मधील असा एक व्यायाम आहे त्यामुळे आरोग्याशी निगडीत समस्या यामुळे दूर होतात. तर मधुमेहासंबंधित असणाऱ्या समस्येसाठी प्राण मुद्रा अतिशय उपायकारक आहे. तसेच डोळ्यांच्या समस्येसाठी सुद्धा लाभदायक आहे.

प्राण मुद्रा शरीरातील सर्व कार्य संतुलित राखण्यासाचे प्रयत्न करते. त्यामुळे खासकरुन मधुमेह असणाऱ्या वक्तींना प्राण मुद्रा करणे अत्यंत फायद्याचे ठरते. तर जाणून घ्या प्राण मुद्रा करण्याचे लाभ आणि फायदे काय आहेत.

- प्राण मुद्रा नियमितपणे केल्यास शरीरातील इंन्सुलिन संतुलित राखण्यास मदत होते. तसेच शरीराच्या प्रत्येक अवअवासाठी प्राण मुद्रा फायदेशीर ठरते.

-विद्यार्थ्यांनी प्राण मुद्रा केल्यास अभ्यास त्यांच्या लक्षात राहण्यास मदत होते. तर एवढच नसून तहान आणि भूक सुद्धा प्राण मुद्रा केल्याने नियंत्रित राहते.

-शरिरातील प्रतिरोधक क्षमता प्राण मुद्रा केल्यास अधिक मजबूत होते.

-शरिरातील थकवा आणि आळसपणा सुद्धा प्राण मुद्रा केल्याने निघून जातो.

-जर तुमच्या डोळ्यांची जळजळ किंवा डोळ्यांसंबधित अन्य समस्या तुम्हाला सतावत असल्यास प्राण मुद्रा नियमित करा.

प्राण मुद्रा करण्यासाठी तुम्हाला कनिष्ठा, अनामिका आणि अंगठा एकमेकांना जुळवा. तर अन्य हाताची बोटे सरळ ठेवा. असे केल्यानंतर दररोज लांब श्वासासह हळूहळू या मुद्रेचा अभ्यास 45 मिनिटे केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.