मागे सरलेल्या 2019 वर्षातील चुका पुन्हा होऊ नये यासाठी 2020 मध्ये काय नवीन काय नवीन करता येईल असा प्रश्न अनेकांना पडला असेल. सर्ताय वर्षात आपल्याकडून काय चांगल्या गोष्टी करणे राहून गेलो, आपण कुठे कमी पडलो याची अनेक जण हिशोब मांडले असतील. निघून गेलेलं वर्ष आपल्याला काय शिकवून गेलं हे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला शक्य तितका तुमच्यात बदल करणे गरजेचे आहे. या जगात आपल्याला एकतर भावनाप्रधान माणसे पाहायला मिळतात अन्यथा भावना नसलेली माणसे पाहायला मिळतात. त्यांच्या या स्वभावामुळे अनेकांचे नुकसान होते. म्हणून नवीन वर्षात संकल्प करण्यासोबत आपल्या स्वत: हात कोणता बदल करता येईल हे पाहणे गरजेचे आहे.
तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व लोकांसमोर चांगले बनविण्यासाठी तुम्हाला तशा पद्धतीने वागणे गरजेचे आहे. यासाठी काही खास गोष्टींचा अभ्यास करणेही गरजेचे आहे.
1. नकारात्मक ऊर्जांपासून दूर रहा
तुम्ही जेवढं सकारात्मक राहाल तेवढा दिवस उत्तम जाईल.
2. उत्साह
आदल्या दिवशी घडलेल्या प्रसंगांचं शल्य मनात ठेवून भूतकाळासाठी न जगता वर्तमान आणि भविष्याचा विचार करा. यासाठी तुम्ही कायम आशावादी रहायला हवं.
3. स्वत:ची मत ठरवा मत योग्य पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करा
स्वत:ची मत ठरवा आणि समोरच्या व्यक्तीपुढे निर्भीडपणे मांडण्याची ताकद ठेवा
हेदेखील वाचा- New Year 2020: नववर्षात कोणते संकल्प करु शकता; पाहा काही भन्नाट आयडियाज
4. निर्णय क्षमता
जगाचा सल्ला घ्या पण कोणताही निर्णय घेताना तो स्वत: विचार करून घ्या. कारण चांगलं काय किंवा वाईट काय दोन्ही गोष्टी घडल्या तरी आपला निर्णय तो आपला निर्णय असल्यामुळे त्याचे फारसे वाईट वाटत नाही.
5. आनंदी रहा.
सतत तणाव, दु:ख यामुळे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. स्वत:साठी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक दिवस आपल्याला चांगला वाटतो. आपले पाय खेचणारे आहेत त्यामुळे तुम्ही कायम आनंदी असाल तर त्याचा तुमच्या कामावर चांगला परिणाम होणार आहे.
6. करा आणि शिका
एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल मनात पडलेल्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी ती गोष्ट आधी करा आणि मग त्यातून काही शिकायला मिळतं का ते पाहा
7. कायम स्वत:ला प्रोत्साहन द्या
आपल्याला इतर कोणीही प्रोत्साहन दिलं नाही तरीही आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो हे कायम लक्षात ठेवा. अशावेळी आरशामध्ये स्वत:सोबत बोलण्याचा प्रयत्न करा. स्वत:ला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा
8. नियोजन करा
आयुष्यात नियोजनाला आणि वेळेला फार महत्त्व आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही आणि चुकलेलं नियोजन तुमचा सगळा दिवस, वेळ आणि वर्ष संकट ओढवू शकतो.
हेदेखील वाचा- Happy New Year 2020: नवीन वर्षात करा 'हे' महत्त्वपूर्ण सामाजिक संकल्प; होईल मोठा फायदा!
9. ताण घेऊ नका
रोज सकाळी उठल्यावर व्यायाम नक्की करा. तणाव कमी करण्याचा हा एक अतिशय महत्त्वाचा उपाय आहे. रोज किमान 30 मिनिटे सकाळी कोवळ्या वातावरणात व्यायाम करावा.
10. आहार आणि छंद
नव्या वर्षात उत्तम आहार आणि आपला छंद नियमित ठेवण्यावर भर द्या. दिवसभरातील काही मिनिटं तुमचा छंद जोपासला तर क्षीण दूर होतो आणि एक समाधानही मिळतं.
उत्तम आणि निरोगी आरोग्यासाठी आहार आणि झोप महत्त्वाची असते. त्याचं गणित चुकली मग आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो नवीन वर्षात या दहा गोष्टींचे आकलन केल्यास तुम्ही सदैव हसरे-खेळते आणि उत्साही राहाल.