
सकाळी लवकर उठणे ही चांगली सवय आहे. आपल्यातील बरेच लोक आहेत जे सकाळी उठून पाणी पितात, काही ध्यान करतात, काही जण व्यायाम करतात. तर काहीजण रोज मॉर्निंग वॉकला जातात. या सर्व सवयी आरोग्यदायी जीवनशैलीचा एक भाग आहेत. परंतु, सकाळी उठल्यानंतरच्या अशा काही सवयी आहेत ज्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
नुकत्याचं केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, दिवसाची सुरूवात आपल्या संपूर्ण दिवसाच्या आरोग्यावर परिणाम करते. जर तुमची दिवसाची सुरुवात ताजेपणाने भरलेली असेल, तर तुमचा दिवस चांगला जातो. मात्र, दिवसाच्या सुरूवातीला काही गोष्टी चुकीच्या केल्यास त्या सवयी तुम्हाला आजारी बनवू शकतात. त्यामुळे अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या सकाळी उठल्यानंतर टाळायला हव्यात, याविषयी आज आपण या लेखातून जाणून घेऊयात. (हेही वाचा - Coronavirus विरुद्ध लढण्यासाठी 'सुरक्षा कवच' बनू शकतो Dengue; रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी होत आहे मदत, अभ्यासातून खुलासा)
1. धूम्रपान -
दिवसातून कोणत्याही वेळी धूम्रपान केल्यास ते शरीरासाठी हानिकारकचं असते. परंतु, सकाळी उठल्यावर लगेचचं सिगारेट ओढणं अतिशय धोकादायक असू शकते. यामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
2. मद्यपान -
असे बरेच लोक आहेत जे दारू पिऊन दिवसाला सुरूवात करतात. सकाळी अल्कोहोल पिणं आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे सकाळी मद्यपान करणं टाळावं.
3. भांडण करू नका -
दिवसाची सुरुवात सकारात्मक असावी. एखाद्याबरोबर सकाळी उठून भांडण योग्य नाही. यामुळे, आपला मूड दिवसभर खराब राहतो. त्यामुळे सकाळी भांडण करणं टाळा.
4. मसालेदार अन्न -
सकाळी जास्त मसालेदार अन्न खाणे टाळावे. आपण सकाळी जितके हलके आणि पौष्टिक खाऊ शकता तितके आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
5. कॉफी पिणे -
जगातील बहुतेक लोक असे असतात, ज्याची दिवसाची सुरुवात कॉफीच्या कपाने होते. परंतु, तज्ञांच्या मते सकाळी कॉफी पिल्याने कॉर्टिसॉलची पातळी वाढते. त्यामुळे सकाळी उठल्यावर कॉफी पिण टाळा. तुम्ही कामाला सुरुवात केल्यानंतर कॉफीचे सेवन करू शकता.
6. वादग्रस्त गोष्टी पाहणं टाळा -
जर तुम्ही सकाळी उठून टीव्ही लावून बसत असाल, तर कोणत्याही वादग्रस्त म्हणजे भडकाऊ गोष्टी पाहू नका. याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो.
7. झोपेतून उठल्यानंतर पुन्हा झोपण टाळा -
आपल्यातील बहुतेक लोक असे असतील, ज्यांना सकाळी उठणे आवडतं नाही. याशिवाय असेही काही लोक आहेत, जे सकाळी उठल्यानंतर घरातील विविध ठिकाणी जाऊन झोपतात. ही अत्यंत चुकीची सवय आहे. ज्यामुळे आपली झोप पूर्ण झाल्यानंतरही आपल्याला फ्रेश वाटत नाही.