पावसाळा म्हटला की थंडगार वातावरणात वाफळलेला चहा 'सुर्रर्र...' करून पिणे म्हणजे चहा प्रेमींसाठी एक स्वर्गसुखाचा अनुभव असतो. पावसाळ्यात चहात आलं, वेलची पावडर, यासारख्या गोष्टीं टाकून त्याची गोडी अजून वाढवतात पण त्याचबरोबर त्याचे शरीरासही फायदे होतात. यांच्यासोबत आणखी एक गोष्ट चहात वापरतात ती म्हणजे 'गवती चहा' (Lemongrass Tea). काही संशोधनानुसार गवती चहा नियमित आणि प्रमाणात घेतल्यामुळे तुम्हाला मानसिक ताणतणावापासून आराम मिळू शकतो आणि झोपही चांगली लागते.
या गवती चहाचे शरीरास फार फायदे होतात. मानसिक तणावापासून दूर ठेवण्यासोबत तुम्हाला तजेलदार ठेवण्यासाठी गवती चहाचा उपयोग होतो.
पाहूयात गवती चहाचे शरीरास होणारे फायदे:
1. कंबरदुखी, पाठदुखी, अंगदुखीवर गवती चहा गुणकारी ठरू शकतो. त्यामुळे पेनकिलरची औषधे घेण्यापेक्षा गवती चहा पिणे उत्तम.
2. पावसाळ्यातीस सततचा ओलावा आणि उबदारपणा जीवजंतूंसाठी पोषक असतो. या काळात फंगल इनफेक्शनचा त्रास वारंवार होऊ शकतो. या फंगल इनफेक्शनला टाळण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असायला हवी. गवतीचहा मधील पोषक घटक तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. ज्यामुळे तुम्हाला इनफेक्शनचा धोका कमी होतो. Monsoon Health Tips: पावसाळ्यात गवती चहा प्यायल्याने 'या' आजारांपासून दूर राहण्यास होईल मदत
3. गवती चहा प्यायल्याने तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
4. गवती चहा मुळे शरीरातील विषाणूचा नाश होतो आणि शरीरातील घाण बाहेर टाकण्यास मदत होते.
5. पावसाळ्यात होणा-या सर्दी, खोकला यांसारख्या होणा-या साथींच्या आजारांमुळे शरीराला होणारा त्रास कमी होतो.
एवढच नव्हे तर संधिवात असलेल्या माणांसाठी गवती चहा उपयुक्त ठरू शकतो. गवती चहा हा गरम असल्याने आहारात त्याचा वापर करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या अथवा नियंत्रणात वापर करा. अन्यथा कुणाच्या शरीरात जास्त उष्णता असेल तर त्याना त्याच त्रास होऊ शकतो.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)