पुरुषांच्या शरीरामध्ये तयार होणारे सेक्स हार्मोन्सला टेस्टोस्टेरोन असे म्हटले जाते. हे हार्मोन सेक्स ड्राइव्ह वाढवण्यासाठी काम करतात. टेस्टोस्टेरोनच्या कमीमुळे शरीरात काही प्रकारचे बदलाव येऊ लागतात. जाणून घ्या त्या लक्षणांबद्दल जे टेस्टोस्टेरोन हार्मोनच्या कमतरतेमुळे दिसतात. तर अधिक थकवा येणे हे टेस्टोस्टेरोनच्या कमतरतेचे प्रमुख लक्षण आहे. या हार्मोन्सच्या कमीमुळे असे वाटते की, जसे शरीरात काहीच उर्जा शिल्लक राहिलेली नाही. वाढत्या वयासह तणाव हे सुद्धा एक लक्षण असू शकते. कमीत कमी 8 तासांची झोप तुमची उर्जा वाढवण्यास मदत करते. या व्यतिरिक्त हार्मोन्सच्या तपासासाठी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
टेस्टोस्टेरोनच्या कमतरतेमुळे तुमच्या सेक्स ड्राइव्हमध्ये कमी येऊ शकते. यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या सुद्धा उद्भवू शकते. दरम्यान. इरेक्टाइल डिसफंक्शनची काही कारणे सुद्धा असू शकतात. जसे हार्ट किंवा डायबिटीजचा आजार. जर तुमच्यात टेस्टोस्टेरोनची कमी असल्यास याच्या ट्रीटमेंटनंतर तुमची सेक्स ड्राइव्ह उत्तम होऊ शकते.(Health Tips: सावधान! तुम्हाला मोजे घालून झोपण्याची सवय आहे? तर मग होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम)
या समस्येमुळे एखाद्यावेळेस तुमच्या स्मरणशक्तीवर सुद्धा प्रभाव पडू शकतो. तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यासाठी समस्या येऊ शकते. हे लक्षण अशावेळी दिसते जेव्हा तुमच्या शरीरात टेस्टोस्टेरोनचा स्तर अत्यंत कमी होतो. या व्यतिरिक्त तुम्हाला डिप्रेशन सुद्धा जाणवते. अशावेळी तुम्ही जर मेडिटेशन, योगा, व्यायामाचा आधार घेतल्यास तुम्हाला फायदेशीर ठरु शकते.(Vitamin E चा निरोगी शरीरासाठी कसा फायदा होतो? बदामापासून ब्रोकली पर्यंत 'या' पदार्थांमधून मिळते हे जीवनसत्व)
टेस्टोस्टेरोनचा स्तर हा तुमच्या मूडवर सुद्धा प्रभाव पाडू शकतो. त्यामुळे तुम्हाला नेहमीच निराशा वाटते आणि दिवस वाईट जात असल्याचे ही भासत. याच्या कारणामुळे काही पुरुषांमध्ये व्यक्तिगत बदल झालेले सुद्धा दिसून येतात. ट्रिटमेंट नंतर जेव्हा टेस्टोस्टेरोन सामान्य होतो तेव्हा तुम्हाला आधीसारखेच फ्रेश वाटू लागते.