इंदौर: रूग्णाचे हृद्य, यकृतासह अनेक अवयव विरूद्ध बाजुला, तब्बल 37 वर्षांनंतर लागला पत्ता, निमित्त ठरलं अ‍ॅपेडिंक्सचं ऑपरेशन
Human Body (Photo Credits: File Photo)

इंदौरमध्ये पोटदुखीची समस्या घेऊन आलेला 37 वर्षीय रूग्ण सरकारी हॉस्पिटलमध्ये आला मात्र तपासणी दरम्यान त्याचे ह्रद्य डाव्या बाजूला नव्हे तर उजव्या बाजूला धडकत असल्याची माहिती डॉक्टरांनी त्याला दिली. ही घटना इंदौर येथील यशवंतराव होळकर (Maharaja Yeshwantrao Hospital) हॉस्पिटल येथील आहे.

अ‍ॅपेंडिक्सच्या ऑपरेशनपूर्वी जेव्हा रूग्णाची तपासणी करण्यात आली तेव्हा त्याच्या शरीरात जन्मजात दोषांमुळे काही अवयवांमध्ये व्यंग असल्याचं समोर आलं. त्यानुसार त्याच्या हृद्यासोबत यकृताची जागा देखील बदलली आहे.

शरीरातील अनेक अवयवांची जागा बदलली असली तरीही त्याचे काम नियमित सुरू होते. रूग्नाला कोणताच त्रास जाणवत नव्हता. आपल्या शरीरात अवयवांची ठेवण विरूद्ध दिशेला असल्याचं 37 वर्षात पहिल्यांदाच त्याला समजलं.