Monkeypox Virus Test: भारतीय कंपनीला मोठं यश; मंकीपॉक्स विषाणूची चाचणी करण्यासाठी RT-PCR किट तयार
Monkeypox Virus Test (PC - Twitter)

Monkeypox Virus Test: जगात मंकीपॉक्स विषाणू (Monkeypox Virus) च्या वाढत्या उद्रेकात भारतीय कंपनीला मोठे यश मिळाले आहे. चेन्नईस्थित वैद्यकीय उपकरण कंपनी त्रिविट्रॉन हेल्थकेअर (Trivitron Healthcare) ने म्हटले आहे की, त्यांनी मंकीपॉक्स विषाणू संसर्गाचा शोध घेण्यासाठी रिअल-टाइम RT-PCR-किट विकसित केले आहे. कंपनीने शुक्रवारी सांगितले की, मंकीपॉक्स आरटी-पीसीआर किट हे चार-रंगी फ्लूरोसेन्स-आधारित किट आहे. जे एक-ट्यूब सिंगल रिअॅक्शन फॉरमॅटमध्ये स्मॉलपॉक्स आणि मंकीपॉक्समध्ये फरक करू शकते.

कंपनीने सांगितले की, जर टेस्ट किटमध्ये व्हायरस असेल तर तो शोधण्यासाठी सुमारे 1 तास लागतो. VTM (व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडिया) मधील ड्राय स्वॅबचा वापर पुढील चाचणीसाठी केला जाऊ शकतो. (हेही वाचा -Monkeypox Infection: ताप, अंगदुखी, सूज आदी लक्षणं असल्यास सतर्क राहा; ICMR ने मंकीपॉक्सबाबत दिला 'हा' सल्ला)

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मंकीपॉक्सच्या प्रयोगशाळेत पुष्टीकरणासाठी त्वचेच्या जखमेचे साहित्य, स्वॅब जखमेच्या स्कॅबसारखे नमुने घेण्याची शिफारस केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी सांगितले की, जगभरात मंकीपॉक्सची प्रकरणे वाढली आहेत. ज्यामुळे 20 देशांमध्ये एकूण संसर्गाची संख्या 200 झाली आहे.

भारतात आतापर्यंत एकही केस आढळून आलेला नसला तरी आयसीएमआरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारत पूर्णपणे तयार आहे. त्याचवेळी आरोग्य मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, जर एखाद्या रुग्णाला मंकीपॉक्सची लक्षणे दिसली तर त्याला ताबडतोब वेगळे करा.

WHO ने म्हटले आहे की, जगात आतापर्यंत मंकीपॉक्सची 200 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. येत्या काही दिवसांत त्यांची संख्या वाढण्याची भीती आहे. डब्ल्यूएचओ मधील कोविड-19 प्रतिसादाच्या तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सांगितले की, बहुतेक मंकीपॉक्स प्रकरणे पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांच्या लोकसंख्येमध्ये आहेत. परंतु, हे केवळ त्या गटासाठीच असेल असे नाही.