Fit India Movement: मिशन फिट इंडिया कार्यक्रमास सुरुवात, जाणून घ्या 5 महत्त्वाचे मुद्दे; पाहा Live Streaming
Fir India Movement (Photo Credits: ANI)

Fit India Movement: राष्ट्रीय क्रीडा दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवसाचे औचित्य साधत भारत सरकार मिशन फिट इंडिया हा उपक्रम हाती घेत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना तंदुरुस्त राहण्याचे महत्त्व सांगितले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्ली येथून या उपक्रमास गुरुवारी (29 ऑगस्ट 2019) सुरुवात झाली. या कार्यक्रमावेळी केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. हा उपक्रम शहर ते ग्रामीण भारत अशा सर्व स्तरांतून राबविण्यात येणार आहे. जाणून घ्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाबाबत 5 महत्त्वाचे मुद्दे.

सरकार सर्व मंत्रालयांना सोबत घेऊन राबवणार उपक्रम

केंद्र सरकारने Fit India Movement हा उपक्रम क्रीडा मंत्रालयांतर्गत राबवला आहे. मात्र, याचा अर्थ असा नव्हे की हा उपक्रम केवळ क्रीडा मंत्रालयच राबवेन. केंद्र सरकार आपल्या इतरही विविध मंत्रालयांना सोबत घेऊन हा उपक्रम लॉन्च करत आहे. इतर मंत्रालयंही या अभियानाला सहकार्य करणार आहेत. यात प्रामुख्याने मनुष्यबळ विकास मंत्रालय, शहर विकास मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालय यांचा समावेश असणार आहे.

प्रसिद्ध व्यक्तिमत्वांना सोबत घेतले जाणार

Fit India Movement लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रसिद्ध व्यक्तिमत्वं आदींना सोबत घेणार आहे. जेणेकरुन समाजातील तळागाळातील नागरिकांपर्यंत हा उपक्रम पोहोचण्यास मदत होईल. मैरीकॉम, राजनाथ सिंह, कॉनरेड संगमा यांसारख्या अनेक मंडळींनी या उपक्रमाची माहिती ट्विटरच्या माध्यमातून या आधिच दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिशन फिट इंडिया कार्यक्रमास सुरुवात

विविध स्तरांवर काम होणार

नागरिकांच्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार योग कार्यक्रमाच्या माध्यमातून या आधीच प्रयत्न करत आहे. मात्र, Fit India Movement उपक्रमाच्या माध्यमातून लोकांमद्ये तंदुरुस्थीसाठी अधिक प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकार हा उपक्रम विविध स्तरांवर राबवणार आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालयं, महिला, बालक, तरुण, ज्येष्ठ आणि वृद्ध अशा सर्वंच वयोगटातील स्तरांवर काम केले जाणार आहे.

Fit India Movement उपक्रमासाठी सरकार करणार प्रसिद्धी

फिट इंडिया अभियान प्रत्यक्ष जनतेच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनविण्यासाठी केंद्र सरकार स्वत: प्रयत्न करणार आहे. त्यासाठी रेडीओ, टीव्ही, वृत्तपत्र, इंटरनेट आदी माध्यमांतून या उपक्रमाची माहिती दिली जाणार आहे.

सुदृढ आरोग्यात भारत पाठिमागे

जागतिक पातळीवर विचार करता भारत नागरिकांच्या सुदृढतेत बराच मागे आहे. देशातील एकूण GDP चा बहुतांश हिस्सा हा नागरिकांच्या आरोग्यावर खर्च होतो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण, आदी गोष्टींवर भारत गांभीर्याने काम करु इच्छित आहे. विशेष म्हणजे नागरिकांच्या आरोग्याबाबत बोलायचे तर, श्रीलंका, मालदीव, भूतान यांसारखे देशही भआरताच्या पुढे आहेत.