Menstrual (Photo Credits: pexels)

महिलांना येणारी मासिक पाळी (Menstrual) ही जरी नैसर्गिक गोष्ट असली तरीही या दिवसात महिलांना होणारा त्रास हा असह्य करणारा असतो. दर महिन्याला येणा-या मासिक पाळीत महिलांना ओटीपोटीत तसेच कंबरेखाली असह्य वेदना होतात. मासिक पाळीत होणा-या रक्तस्त्रावामुळे खूप अशक्त तसेच थकवा जाणवतो. अशा वेळी स्त्रियांना या त्रासापासून सुटका मिळण्यासाठी अनेकदा पेनकिलर औषधे घेतात. मात्र हे देखील महिलांच्या शरीरास घातक असल्याचे आढळून आले आहे. अशा स्थितीत तुम्ही घरगुत उपायांनी हा त्रास कमी करु शकता.

पाळीच्या त्या दिवसात पोटाखालच्या भागात आणि कंबरेत दुखणं सामान्य बाब आहे. मात्र या वेदना महिलांसाठी फार त्रासदायक असतात. म्हणून अशावेळी घरगुती उपायांनी तुम्ही या वेदना कमी करु शकता.

मासिक पाळीत होणारी पोटदुखी थांबविण्यासाठी काय कराल?

1. गाजराचा ज्यूस करुन प्यायल्याने मासिक पाळीतील पोटदुखी कमी होते.

2. आलं, काळीमिरी, वेलची घातलेला चहा घ्या ज्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

3. मासिक पाळीत एक ते दोन दिवस नारळाचे तेल अथवा तिळाचे तेल कोमट करून ओटीपोटावर त्याने मसाज करा. मासिक पाळी लांबविण्यासाठी गोळ्यांऐवजी सेवन करा या '5' नैसर्गिक आणि पौष्टिक गोष्टी

4. आपल्या नाश्त्यामध्ये एक ग्लास दुधाचा समावेश करा. यातील कॅल्शिअममुळे पोटदुखी कमी होते.

5. पोटावर हिंगाचे पाणी लावल्याने देखील तुम्हाला आराम मिळू शकतो.

रताळी खाल्ल्याने त्या दिवसांमधील वेदना कमी होतात. यातील अँटीस्पॅज्माडिक गुण वेदना सहन करण्यास मदत करतात. मासिक पाळी हे नैसर्गिक गोष्ट असल्यामुळे त्यामुळे होणा-या वेदना कमी करण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचाच वापर करणे हितावह आहे.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)