
Health Tips: दीर्घायुष्यासाठी सुदृढ आयुष्य जगणे फार महत्वाचे आहे. खाण्यापिण्यापासून ते अयोग्य सवयींमुळे याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. अशातच एका नव्या अभ्यासानुसार रोज 7 हजार पावले चालल्याने कमी वयात मृत्यूचा धोका 50-70 टक्के टळतो. हा अभ्यास JAMA नेटवर्क ओपन जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.(Health Tips: दही आणि मनुका एकत्र खाल्याने शरीराला मिळतात भरपूर प्रथिने, जाणून घ्या अधिक फायदे)
फिजिकल अॅक्टिव्हिटी एपिडेमायलॉजिस्ट आणि स्टडीचे प्रमुख लेखक अमांडा पलुच यांनी म्हटले की, 10 हजार स्टेप्स चालणे किंवा वेगाने चालण्याने कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त फायदा मिळालेला नाही. त्यांनी 10 स्टेप्स चालण्यासाठी जापानी पेडोमीटराठी जवळजवळ एक दशक जुन्या मार्केटिंग कॅम्पेनचा हिस्सा असल्याचे म्हटले आहे.
यासाठी संशोधकांनी कोरोनारी आर्टरी रिस्क डेव्हलेपमेंट इन यंग एडल्ट (CARDIA) स्टडी मधून डेटा घेण्यात आला आहे. जो 1985 वर्षात सुरु झाली होती. यावर अद्याप शोध सुद्धा सुरु आहे. 38-50 वर्षादरम्यान 2100 नागरिकांवर 2006 मध्ये एक्सीलेरोमीटर घालण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे आरोग्य जवळजवळ 11 वर्षापर्यंत मॉनिटर केले. त्यानंतर 2020-21 मध्ये याच्या डेटाचे विश्लेषण केले. यामध्ये सहभाही असलेल्या नागरिकांचे विविध गट तयार करण्यात आले. यामध्ये पहिला लो स्टेप वॉल्यूम (दररोज 7 हजार पेक्षा कमी स्टेप्स), दूसरा मॉडरेट (7-9 हजार स्टेप्स) आणि तिसरा हाय (10 हजार स्टेप्स).(Kegel Exercise: कीगल एक्सरसाइज कशी करावी? व्हिडिओमध्ये पहा स्टेप्स आणि हा व्यायाम करण्याची योग्य पद्धत)
आभ्यासाच्या आधारावर विशेषतज्ञांनी असे म्हटले की, दररोज 7-9 हजार स्टेप्स चालणाऱ्या वॉलिंटर्सला अधिक फायदा झाला आहे. मात्र दररोज 10 हजार हून अधिक पावले चालणाऱ्यांना आरोग्यासंबंधित कोणताही अतिरिक्त लाभ झालेला नाही. संशोधकांना असे कळले की, 7 हजार स्टेप्स चालण्याने मृत्यूचा धोका 50-70 टक्के कमी होतो.