उन्हाळा म्हटला की अंगाची लाहीलाही होणे हा प्रकार आलाच... बाहेरून जितका उकाडा आपल्याला जाणवत असतो, तितकीच उष्णता शरीराला आतून देखील जाणवत असते. अशा वेळी ही उष्णता कमी करण्यासाठी शरीरात खूप पाणी आणि शरीरातील उष्णता कमी करणारे पदार्थ, भाज्या, फळे जाणे गरजेचे असते. अशा वेळी सर्वात उत्तम अशी गोष्ट म्हणजे 'कोशिंबीर' (Salad). यामुळे शरीरात पाणीही भरपूर प्रमाणात जाते, शरीरातील हिटही कमी होते आणि सर्वात महत्त्वाचे अनेक पोषकतत्वे मिळतात.
सध्याच्या कोरोना काळात उन्हात घराबाहेर पडणे देखील धोक्याचे आहे. उकाडा देखील वाढत चालला असून मे महिन्यात याहून जास्त उष्णता जाणवेल. यावेळी रोज कोशिंबीर खाणे उत्तम. कोशिंबीर खाण्याचे असेही काही फायदे आहेत ज्यामुळे तुमच्या शरीराला पोषक जीवनसत्त्वे मिळतात. पाहूयात काय आहेत हे फायदेशीर
- कोशिंबीरमध्ये अँटिऑक्सिडेंट समृद्ध असल्याने आपणास व्हिटॅमिन सी, ई, लाइकोपीन, फॉलिक असिड आणि अल्फा आणि बीटा कॅरोटीन मिळतात. कच्च्या किंवा हिरव्या कोशिंबीरीमध्ये हे पोषक असल्यामुळे आपल्या शरीरावर भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स भेटतात. तर मुक्त रॅडिकल्समुळे शरीराचे नुकसान होत नाही आणि शरीराची रोप्रतिकारक शक्ती वाढते.हेदेखील वाचा- Health Tips: उन्हाळ्यात जास्त प्रमाणात कलिंगड खात आहात? मग आताच सावध व्हा, होऊ शकतात 'या' समस्या
- कोशिंबीर मध्ये असलेले पौष्टिक घटक रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, अल्झायमर इ. फोलेट हृदयाच्या समस्या दूर करण्यास मदत करते आणि हृदय निरोगी ठेवते.
- कोशिंबीरमुळे पचनक्रिया सुधारते आणि पित्त, पोटाची जळजळ यांसारख्या समस्या उद्भवत नाही.
- कोशिंबीरीमध्ये कॅलरी कमी असते, म्हणून जास्त कोशिंबीर खाल्याने कोणतीही समस्या उद्भवत नाही. तसेच वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
- कोशिंबीर त्वचेचे सौंदर्य वाढवते किंवा त्वचा निरोगी ठेवते, रक्त परिसंचरण वाढवते, कोलेस्टेरॉल कमी करते, हाडे व दात मजबूत होते.
थोडक्यात कोशिंबीर आपल्या शरीराला सर्वांगाने फायदा होतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात नियमितपणे आपल्या जेवणासह वा अन्य वेळेस कोशिंबीर खाल्लेली उत्तम.
(टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)