प्रतिकात्मक फोटो (Photo Credit : Pixabay)

नवरात्र सुरु आहे. नवरात्रीच्या काळात अनेकांचे नऊ दिवस उपवास असतात. सामान्यपणे देव/देवतांवरील भक्ती, श्रद्धा, आस्था यासाठी व्रत-उपवास केले जातात. पण तुम्हाला ठाऊक आहे का? उपवासामुळे आरोग्यासही अनेक फायदे होतात. उपवास केल्याने मन, डोके, शरीर यावर चांगला परिणाम होतो आणि त्यामुळे अनेक फायदे मिळतात. आरोग्याचं गणित सांभाळत नवरात्रीत उपवास कसा कराल ?

# उपवास केल्याने शरीराचे आतून शुद्धीकरण होते. यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते आणि शरीर स्वस्थ राहते.

# अपचन, गॅस, बद्धकोष्ठता, डायरिया, अॅसिडीटी, जळजळ यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. उपवासात फळांचे सेवन केल्याने आरोग्यास अधिक फायदा होतो.

# उपवास केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. त्याचबरोबर कोलेस्ट्रोल कमी होते. परिणामी आरोग्याच्या अनेक समस्यांना आळा बसतो.

# कोलेस्ट्रॉल कमी झाल्यास हृदयाचे आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होईल.

# पचनक्रियेचे कार्य सुधारण्यासाठी उपवासाचा फायदा होतो. आठवड्यातून कमीत कमी एक दिवस उपवास केल्याने पचनक्रियेचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते.