केसांना फाटे फुटण्याची समस्या अनेक महिलांमध्ये, मुलींमध्ये दिसून येते. मुळात केसांना वापरण्यात येणारे केमिकल्स आणि हेअर स्ट्रेटनर यामुळे केसांना फाटे फुटण्याचा धोका जास्त असतो. केसांना फाटे फुटणे (Hair Split End) म्हणजे केस दोन भागात विभागणे हे आहे. केसांना फाटे फुटल्यामुळे केस रुक्ष होतात आणि केसांची वाढही खुंटते. फाटे हे केसांना कुठेही फुटू शकतात. पण शक्यतो लांब केसांच्या शेवटच्या टोकाला फुटतात. केसांना फाटे फुटण्याच्या समस्येमुळे केसांचा आकार बदलतो आणि केसांचे सौंदर्यही कमी होते. अशा वेळी त्यांची योग्य ती काळजी घेणे जरुरीचे आहे. यात केसांना फाटे फुटू नये म्हणून आपण वेगवेगळ्या शॅम्पू किंवा केमिकल्स वापरून तुम्ही त्वरित उपाय करण्याचा प्रयत्न करतात.
यात काही वेळा या गोष्टींचा केसांवर चांगला परिणाम होतो तर कधी या केमिकल्सचा केसांवर विपरित परिणामही होतो. म्हणूनच आम्ही आज तुम्हाला असे 5 घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यात कुठल्याही प्रकारचे केमिकल्स नसून त्या अगदी नैसर्गिक आहेत.
1. कोरफड (Aloe Vera)
कोरफडमध्ये अनेक पोषक तत्त्व असतात. ज्यामुळे केसांना फाटे फुटण्याचं प्रमाण कमी होतं. त्यासाठी तुम्हाला कोरफड जेलमध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि दोन चमचे एरंडेल तेल मिसळून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण घेऊन केसांना मसाज करा. मसाजनंततर साधारण अर्धा तास हे मिश्रण केसांवर तसंच राहू द्या. त्यानंतर केस शँपूने धुवून टाका.
2) केळं फायदेशीर (Banana)
एक केळं मिक्सरमधून नीट वाटून घ्या आणि त्यामध्ये थोडं एरंडाचं तेल मिक्स करा. तसंच त्यामध्ये 2 मोठे चमचे दूध आणि थोडा मध घालून मिक्स करून घ्या. हा मास्क आठवड्यातून एकदा साधारण अर्धा तास लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवून टाका. अतिशय वाईट दिसणाऱ्या आणि फाटे फुटलेल्या केसांवर हा अगदी रामबाण उपाय आहे. Health Tips: रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालल्याने या आजारांपासून राहाल दूर; आश्चर्यकारक फायदे ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
3) पपायाचं पॅक (Papaya Pack)
प्रोटीन आणि अमिनो अॅसिडचं प्रमाण पपायामध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे, मुळापासून केस चांगलं राखण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला पपई नीट वाटून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप दही घेऊन नीट मिक्स करा. हे पॅक तुम्ही साधारण 45 मिनिट्स लावा. त्यानंतर केसांना नीट शँपूने धुवा. आठवड्यातून तुम्ही एकवेळ असं केल्यास, लवकरच तुम्हाला केसांच्या फाटे फुटण्याच्या समस्येपासून सुटका मिळेल.
4) गरम तेलाने मालिश
केसांवर करण्यात आलेल्या मालिशमुळे डोक्यातील रक्तप्रवाहदेखील चांगला राहतो. त्यामुळे केसांचा लवकर विकास होतो आणि केस वाढतात. नियमित स्वरुपात घरामध्ये तेल गरम करून व्यवस्थित मालिश करा आणि त्यानंतर तुमचे केस गरम टॉवेलमध्ये बांधून थोडा वेळ तसेच राहू द्या. थोडा वेळ जाऊ दिल्यानंतर केस शँपूने धुवा.
5) अंड्याचं मास्क (Egg Mask)
अंड्याचा मास्क बनविण्यासाठी एक अंड (बलकासह), एक चमचा दही, त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घ्या आणि मिक्स करून तुमच्या केसांना साधारण 45 मिनिट्स लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. असं आठवड्यातून एकदा नक्की करा.
हे उपाय अगदी नैसर्गिक असल्यामुळे याचा केसांवर कोणताही विपरित परिणाम होणार नाही. मात्र तुम्हाला केसांसंबंधी काही अन्य समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच हे उपाय ट्राय करा.