Health Tips: रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालल्याने या आजारांपासून राहाल दूर; आश्चर्यकारक फायदे ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Walk (Photo Credits: PixaBay)

घड्याळ्याच्या काटावर चालणा-या आणि पैशासाठी दिवस-रात्र कष्ट करणा-या माणसाला स्वत:च्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी देखील फुरसत नाही. त्यात बदलत जाणा-या जीवनशैली मुळे तसेच प्रवासासाठी आलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे लोक पायी चालणे जणू विसरुनच गेले आहे. मात्र यामुळे वजन वाढणे, स्थूलपणा येणे, वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देणे असे प्रकार या लोकांसोबत हमखास होताना दिसतात. मग डायटिंग करणे, जिम लावणे, अतिरिक्त चरबी घटविण्यासाठी गोळ्या खाणे असे अनेक उपदव्याप करतानाही काही माणसे दिसतात. याचा कधी कधी शरीरावर उलट परिणाम झालेलाही पाहायला मिळतो. त्यामुळे या सगळ्यांमध्ये फिट राहण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय म्हणजे 30 ते 60 मिनिटे चालणे.

बदलत्या राहणीमानाने लोक ब-याचशा आजारांच्या विळख्यात अडकले आहेत. यात हार्ट अटॅक, मधुमेह, डिप्रेशन यांसारखे आजार लोकांमध्ये पाहायला मिळतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पायी चालल्याने कोणते आजार होण्याचा धोका टळू शकतो ते सांगणार आहोत.

1. रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते

2. रोज कमीत कमी 1 तास पायी चालल्याने अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते.

3. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो.

हेदेखील वाचा- Health Tips: सीताफळाच्या या '5' गुणकारी फायदयांपासून तुम्ही आहात का अजाण? जाणून घ्या सविस्तर

4. दिवसातून 30 मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36 टक्के कमी असते.

5. पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29 टक्के कमी होतो.

6. आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता 30 टक्के कमी होते.

7. चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत होते

8. दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलंय.

9. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.

10. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.

मोतीबिंदूची शक्यता देखील नियमितपणे चालण्यामुळे कमी होते. तसेच हाडे मजबूत करण्यास, रोगप्रतिककार शक्ती वाढविण्यास रोज पायी चालणे फार फायदेशीर ठरते.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)