Health Tips: सीताफळाच्या या '5' गुणकारी फायदयांपासून तुम्ही आहात का अजाण? जाणून घ्या सविस्तर
Custard Apple (Photo Credits: PixaBay)

प्रत्येक ऋतूमध्ये त्या त्या हवामानानुसार येणारी फळे मिळतात ज्याला आपण त्या फळांचा सीझन म्हणतो. थंडीत अनेक भाज्यांसह अनेक फळे मिळतात. त्यात सर्वात आवर्जून ज्या फळाचा वारंवार उल्लेख केला जातो तो म्हणजे सीताफळ (Custard Apple). हे फळ जितके चवदार असते त्याच्या कित्येक पटींनी जास्त ते शरीरासाठी गुणकारी असते. तशी सर्वच फळांमध्ये निसर्गत: साखर असते. मात्र काही फळे अशी आहेत जी नेहमी गोड असतीलच असे नाही. मात्र सीताफळ हे असे फळ आहे जे कधीही खा ते तुम्हाला गोडच, रसाळ लागते.

सीताफळ गोड आहे म्हणून आपण खातो पण तुम्हाला माहित आहे का त्याचे काही फायदे असे आहेत की ज्याची आपण कधी कल्पना देखील केली नसेल.

जाणून घ्या सीताफळाचे गुणकारी आणि फलदायी फायदे:

1) सीताफळ खाल्ल्याने केस गळण्याचे प्रमाण कमी होते तसेच तुमचे केस पांढरे होत असतील ते सीताफळामधील पोषक घटकांमुळे हे प्रमाण कमी होते.

हेदेखील वाचा- गुजरात: नरेंद्र मोदी यांच्या विजयाचे गोड सेलिब्रेशन,आईस्क्रीम विक्रेत्याने साकारली मोदींच्या चेहऱ्याची सीताफळ कुल्फी (Watch Video)

2) ज्यांना उच्च रक्तदाबाचा (High BP) त्रास असेल त्यांच्यासाठी सीताफळ खाणे खूप फायद्याचे ठरु शकते. कारण यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि पोटॅशिअम मोठया प्रमाणात असते. त्यामुळे हृद्यरोगासाठी हे फार उपयुक्त आहे.

3) अॅसिडीटीचा त्रास होत असेल किंवा जळजळ होत असेल अशा वेळी सीताफळ खाणे फायदेशीर ठरु शकते.

4) आजारपणानंतर येणारा अशक्तपणा दूर करण्यासाठी सीताफळ गुणकारी ठरु शकतो.

5) हृद्याच्या मांसपेशी बळकट नसल्याने हृद्याचे ठोके जरा जास्त पडतात. अशा वेळी या मांसपेशी मजबूत करण्यासाठी सीताफळ खाणे आरोग्यदायी ठरते.

सीताफळ पित्तनाशक, रक्तवर्धक, बलवर्धक असल्या कारणाने ते अनेक आजारांवर गुणकारी आहेत. त्यामुळे वर सांगितलेले उद्भवले असतील तर सीताफळाचे सेवन अवश्य करावे.