रशियाची (Russia) कोविड 19 व्हॅक्सिन Sputnik V मध्ये ओमिक्रॉन वायरसला (Omicron Variant) रोखण्याची क्षमता असल्याचं एका अभ्यासामधून समोर आलं आहे. सध्या जगभरात ओमिक्रॉन या कोविड 19 व्हायरंटमुळे जगात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. Gamaleya Center या प्रिलिमिनरी लॅबोरेटरीच्या अभ्यासाचा अहवाल MedRxiv कडून जाहीर करण्यात आला आहे. रशियन लसीकडून कोरोना वायरसचा हल्ला परतवण्यात यश मिळणार असल्याचं तसेच गंभीर आजारपण आणि हॉस्पिटलायझेशन चा धोका कमी करण्यास मदत होणार आहे.
स्फुटनिक वी लस घेऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटलेल्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. त्यांच्यामध्ये लॉंग लास्टिंग प्रोटेक्शन असल्याचं समोर आलं आहे. स्फुटनिक वी मध्ये स्ट्रॉंग आणि लॉंग लास्टिंग़ टी सेल रिस्पॉन्स आहे. स्पाईक प्रोटीन्स मधील 80% एपिटोप्स हे म्युटेशनमुळे प्रभावित होत नाहीत. स्फुटनिक वी मधील लॉंग लास्टिंग टी सेल इम्युनिटी कॉट्रिब्युशन मुळे 80% इफिकसी डेल्टा वर 6-8 महिने प्रभावी आहे असे अभ्यासामधून समोर आले आहे. नक्की वाचा: Omicron in India: 'ओमायक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा प्रकारापेक्षा कमीत कमी तीनपट जास्त संसर्गजन्य'- आरोग्य सचिव राजेश भूषण.
ANI Tweet
The study was conducted using sera with a long period after vaccination (more than 6 months after vaccination) as an indicator of Sputnik V’s long-lasting protection: Sputnik V
— ANI (@ANI) December 22, 2021
अभ्यासामधून ही गोष्ट देखील समोर आली आहे की स्फुटनिक लाईट हा बुस्टर डोस ओमिक्रॉनला रोखू शकतो. स्फुटनिक वी आबु स्फुटनिक लाईट चा बुस्टर डोस ओमिक्रॉनला रोखण्यासाठी 80% प्रभावी आहे. लसीकरणानंतर सहा महिने उलटल्यानंतरही 80% प्रभाव राहत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.