Garlic for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी सकाळी उठून खा लसूण; लवकरच दिसून येईल परिणाम
Garlic (Photo Credit: Pixabay)

Garlic for Weight Loss: वाढत्या वजनामुळे बहुतेक लोक चिंतेत असतात. वजन जितके सहज वाढते तितके ते कमी करणे अधिक कठीण आहे. अनेक महिने डाएटिंग आणि वर्कआऊट केल्यानंतरही थोडासा फरक होतो. अशा परिस्थितीत लसूण तुम्हाला मदत करू शकतो. होय, थोडं विचित्र वाटेल, पण जेवणाची चव वाढवणारा लसूण वजन कमी करण्यात प्रभावी ठरू शकतो. पोषक तत्वांनी युक्त लसूण आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे. लसूण वजन कमी करण्यासाठी कशी मदत करू शकतो ते जाणून घेऊयात...

लसणात फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी आणि मॅंगनीज भरपूर प्रमाणात असते. हे सर्व पोषक वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. (हेही वाचा -Cinnamon for Weight Loss: दालचिनीच्या चमत्कारी गुणधर्मामुळे काही दिवसात कमी होईल शरीराची चरबी; फक्त दैनंदिन जीवनात 'असा' करा वापर)

लसूण शरीरातील विषारी आणि हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो. यासोबतच पचनशक्ती सुधारते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय लसणात फॅट बर्निंग कंपाऊंड्स आढळतात, जे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ देत नाहीत.

लसणात भूक कमी करण्याचे गुणधर्म आहेत, जे जास्त खाण्याची इच्छा टाळतात. ते खाल्ल्याने तुम्हाला बराच वेळ पोट भरलेले वाटते. त्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा जेवण करण टाळतात. लसूण चयापचय गती वाढवते आणि ऊर्जा पातळी वाढवते. कॅलरी कमी असण्यासोबतच ते कॅलरीज बर्न करण्यास देखील मदत करते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी 'असा' करा लसणाचा वापर -

  • तुम्ही दररोज सकाळी कोमट पाण्यासोबत लसणाची कळी खाऊ शकता.
  • जर तुम्ही ते खाऊ शकत नसाल तर तुम्ही त्याचे पाणी पिऊ शकता. यासाठी रात्री एका ग्लासमध्ये लसूण भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर त्याचे पाणी प्या.
  • लसूण मधासोबत खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी लसणाच्या काही पाकळ्या मधात मिसळून तासभर ठेवा आणि नंतर खा.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि किसलेला लसूण मिसळा आणि रिकाम्या पोटी सेवन करा.