Cinnamon (PC - Facebook)

Cinnamon for Weight Loss: दालचिनी (Cinnamon) हा असाच एक पदार्थ आहे जो सामान्यतः भारतीय स्वयंपाकघरात मसाल्यात आढळतो. करीपासून केकपर्यंत अनेक गोष्टींमध्ये याचा वापर केला जातो. दालचिनीला सौम्य गोड आणि तिखट चव असते. पण ती जेवणाची चव दुप्पट करते. एवढेच नाही तर वजन कमी करण्यासाठीही दालचिनी महत्त्वपूर्ण ठरते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर दालचिनीचा आहारात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात समावेश करणे आवश्यक आहे.

दालचिनी शरीरातील चयापचय वाढवण्यास मदत करते. ज्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगवान होते. वास्तविक, दालचिनीमध्ये असे काही गुणधर्म आहेत, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही. तुम्ही भाजी, काढा, चहा इत्यादींमध्ये दालचिनी किंवा दालचिनी पावडर घालू शकता. (हेही वाचा - Superfoods for Health and Skin Benefits: आरोग्य आणि त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतील 'हे' आश्चर्यकारक सुपरफूड)

वजन कमी करण्यासाठी 'असा' करा दालचिनीचा वापर -

दालचिनी आणि पाणी -

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे दालचिनी टाकून पाणी पिणे होय. यासाठी दालचिनी पावडर पाण्यात टाळून उकळा. या पेयाचे दिवसातून 3-4 वेळा सेवन करा.

लिंबू, मध आणि दालचिनी -

वजन कमी करण्यासाठी लिंबू, मध आणि दालचिनी घालून चहा बनवावा. दालचिनीची एक काडी पाण्यात उकळून त्यात लिंबाचा रस आणि मध टाका. वजन कमी करण्यासोबतच ते शरीराला अनेक प्रकारच्या संसर्गांपासूनही वाचवते.

दालचिनी कॉफी -

जर तुम्ही कॉफी पिण्याचे शौकीन असाल, तर तुम्ही कॉफीमध्ये दालचिनी पावडर टाकून पिऊ शकता. हे खूप आरोग्यदायी आहे. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.

फळांच्या ज्यूसमध्ये दालचिनी -

वजन कमी करण्यासाठी दालचिनीची पावडर फळांच्या आणि भाज्यांच्या रसामध्ये देखील घालता येते. यामुळे ज्यूसची चव तर वाढतेचं, पण वजन कमी होण्यासही मदत होते.

स्प्राउट्स आणि दालचिनी -

पोटाची चरबी कमी करण्यासाठी स्प्राउट्स खाण्याची शिफारस केली जाते. त्यात दालचिनी मिसळून खाणे अधिक फायदेशीर ठरते. यासाठी स्प्राउट्स चाटमध्ये दालचिनी पावडरही टाकता येते.