दूध गरम केल्यानंतरही अनेकदा दूध फाटण्याचा किंवा खराब होण्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळते. मुख्यत्वे उन्हाळ्यात दूध खराब होण्याचे प्रमाण अधिक पाहायला मिळते. अशा वेळी ब-याचदा लोक फाटलेल्या दुधाचे पनीर बनवतात. तर काही लोक ते फेकून देण्याचाही मार्ग अवलंबवतात. जर तुम्ही सुद्धा फाटलेले दूध फेकून देत असाल तर, असे करु नका. खरे पाहता, फाटलेल्या दुधात ब-याच प्रमाणात प्रोटीन असतात. तसेच हे दूध खूपच पौष्टिक असते. दूध आणि त्यातील पाण्याने आपले माांसपेशी मजबूत होतात. तसेच आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करतात.
वजन कमी करण्यासाठीही फाटलेल्या दुधाचा उपयोग होतो. निरुपयोगी म्हणून दुर्लक्षित केलेल्या फाटलेल्या दुधाचे असे काही महत्त्वाचे फायदे आहेत, जे ऐकून तुम्ही आजपासून फाटलेले दूध फेकून देण्याचा विचार करणार नाही. चला तर माहित करुन घेऊयात फाटलेल्या दुधाचे महत्त्वपुर्ण फायदे:
1. पनीर
फाटलेल्या दुधाचा सर्वात महत्त्वाचा आणि प्रचलित वापर म्हणजे त्याचे पनीर बनवणे. कारण पनीर हे नेहमी दूध फाडूनच बनवले जाते. फाटलेल्या दुधापासून बनवलेल्या पनीरचा भाजीत वापर करुन वेगवेगळ्या भाज्या बनवता येतात.
2. खरवस
फाटलेल्या दुधाला एका भांड्यात टाकून ते गरम करा. त्यातील पाणी सुकून गेल्यानंतर त्यात थोडी साखर टाकून तुम्ही खरवस, बर्फी, पेढा यांसारखे पदार्थ बनवू शकता.
3. सूप
जर तुम्ही घरी सूप बनवत असाल, तर फाटलेले दूध तुम्ही सूपात वापरु शकता. ज्याने तुमचे सूप खूपच स्वादिष्ट बनेल. घरगुती सूपामध्ये फाटलेले दूध मिसळल्यास त्याचा सॉफ्टनेस पणा वाढतो आणि त्याची चवही चांगली लागते.
4. भाजी
जर तुम्हाला कोणती पातळ ग्रेवी असलेली भाजी बनवायची असेल तर तुम्ही फाटलेल्या दुधाचा वापर करु शकता. याने भाजीची चवही बदलते आणि शरीराला पौष्टिक तत्ब देखील मिळतात.
5. चपाती
फाटलेल्या दूधाचा वापर नरम आणि पौष्टिक चपात्या बनविण्यासाठी केला जाऊ शकतो. पीठ मळताना त्यात फाटलेल्या दूधाचे पाणी वापरल्यास चपात्या खूप नरम आणि पौष्टिक बनतात.
6. ज्यूस
फाटलेल्या दुधाच्या पाण्याचा वापर ज्यूस ची पौष्टिकता वाढविण्यासाठी केला जातो. ज्यूसमध्ये पाणी मिसळल्याने तो पहिल्यापेक्षा जास्त हेल्दी होतो. तसेच आपल्या शरीराला आवश्यक ते प्रोटीनसुद्धा मिळतात.
7. सौंदर्य निखारण्यासाठी
फाटलेल्या दुधाच्या पाण्याने चेहरा धुतला तर आपली त्वचा खूपच मऊ आण टोन्ड बनते. त्याशिवाय केसांना शॅम्पू लावण्याआधी आणि नंतर हे पाणी वापरल्यास तुमचे केस खूप मऊ आणि चमकदार होतात.
हेही वाचा - बाजारात येणार झुरळाचे दुध; गायी आणि म्हैशीच्या दुधापेक्षा आहे पौष्टिक, जाणून घ्या फायदे
फाटलेल्या दुधाचे आणि त्याच्या पाण्याचा इतका उपयोग आपल्या दैनंदिन आयुष्यात होऊ शकतो, हे कदाचित तुम्हाला माहितही नसेल. त्यामुळे यापुढे दूध फाटल्यास किंवा खराब झाल्यास ते फेकून न देता वरील उपायांपैकी तुम्हाला हवा तसा त्यचा उपयोग करा.
(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)