टॉयलेटमध्ये असताना तुम्ही या गोष्टी करता का?
(Archived, edited, symbolic images)

Dangerous Habits to health: टॉयलेटमध्ये जात नाही असा व्यक्ती जगात कुठेच मिळणार नाही. मिळालाच तर तो, मानव या संकल्पनेत निक्कीच बसणार नाही. याचा सरळ अर्थ असा की, जगभरातील सर्व लोक टॉयलेटमध्ये जातात. पण, तुम्हाला माहती आहे का? टॉयलेटमध्ये गेल्यावर अनेक लोक कळत-नकळत अनेक गोष्टी करत असतात. ज्याचा तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. वरवर पाहाता या गोष्टी अतिशय साधारण वाटाव्यात अशाच आहेत. पण, त्याचा खोलवर विचार केला तर प्रकरण वाटते तितके सोपे नसल्याचे ध्यानात येते. म्हणूनच जाणून घ्या टॉयलेटमध्ये गेल्यावर कोणत्या गोष्टी अथवा सवयी ठरु शकतात घातक.

अधिक काळ टॉयलेटमध्ये बसणे

गंमत अशी की, अनेक लोकांना टॉयलेटमध्ये बसायला आवडते. म्हणे त्यांना रिलॅक्स फिल होते. पण, सावधान! तुम्हालाही जर अशी सवय असेल तर, सावध व्हा. आपल्याला आश्चर्य वाटेल पण, टॉयलेटमध्ये अधिक काळ बसल्याने आरोग्याचे प्रश्न उद्भवततात. जसे की, आपल्या नसांना सूज येते. ज्यामुळे हॅमरेजचा धोका वाढतो. तसेच, जास्त वेळ एकाच स्थितीत बसल्याने पायांच्या स्नायुला तर दुखापत होतेच, पण इतरही अवयांवर परिणाम होतो.

टॉयलेटमध्ये फोनचा वापर करणे

स्मार्टफोन ही आजकाल लोकांची जणू एक गरजच बनली आहे. एकवेळ लोक पाण्याची बॉटल सोबत घेणार नाहीत. पण, स्मार्टफोनला सोडणार नाहीत. स्मार्टफोनचे हे व्यसन इतके गंभीर बनले आहे की, लोक आता स्मार्टफोन टॉयलेटमध्ये देखील घेऊन जाऊ लागले आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का, लोकांना असणाऱ्या घाणेरड्या सवयींपैकी ही एक प्रमुख सवय आहे. टॉयलेटमध्ये असंख्य कीटाणू आण बॅक्टेरीया असतात. त्या बॅक्टेरीया स्मार्टफोनला चिकटतात. महत्त्वाचे असे की टॉयलेट साफ केल्यावर आपण हात तर धुतो. पण, स्मार्टफोन धऊ शकत नाही ना. त्यामुळ त्या बॅक्टेरीया स्मार्टफोनसोबत तशाच तुमच्या सोबत येतात. तोच फोन आपण हाताळतो. त्यामुळे या बॅक्टेरीयांचा संसर्ग आपल्य शरीराला होतो. (हेही वाचा, झटपट अॅसिडीटी दूर करतील स्वयंपाकघरातील हे '५' पदार्थ !)

(Archived, edited, symbolic images)

टॉयलेट करताना जोर लावणे

अनेकांचा असा समज असतो की, टॉयलेट करताना जोर लावल्याने पोट साफ होते. तसेच, जोर लावल्यामुळे पटकन टॉयलेटला होते, असेही काहींना वाटते. पण, असे करणे पूर्णत: चुकीचे आहे. कारण टॉयलेटसाठी जोर लावताना दीर्घ श्वास घ्यावा लागतो. तसेच, हा श्वास सोडल्यावर पुन्हा श्वास घेताना आपल्या नसांवर दाब वाढतो. तसेच, अधिकचा जोर लावताना ताण पेलला नाही तर, नसा तसेच, गुदद्वाराची त्वचाही फाटण्याची शक्यता असते. खास करुन बद्धकोष्टतेचा त्रास असणारे लोक प्रामुख्याने टॉयलेट करताना जोर लावत असतात. पण, त्यासाठी हा जोर लावणे हा उपाय नाही. तर, फायबर युक्त आहार वाढवा. पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा. आवश्यक व्यायाम करा.