COVID 19 Booster Dose For Adults: 10 एप्रिल पासून सुरू होणारा Precaution Dose कोण, कधी, कसा घेऊ शकतात? किंमत किती? घ्या सारं जाणून
Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay.com)nation)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या घोषणेनुसार, भारतामध्ये 10 एप्रिल पासून कोविड 19 लसीच्या बुस्टर डोसची (COVID 19 Booster Dose) सुरूवात केली जाणार आहे. 18 वर्षांवरील सार्‍यांना बुस्टर डोस उपलब्ध करून दिला जाणार आहे असे सांगण्यात आले आहे. काल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार खाजगी लसीकरण केंद्रांवर हे बुस्टर डोस उपलब्ध करून दिले जाणार आहे.

आरोग्यसेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 2.4 कोटींहून अधिक जणांनी बुस्टर अर्थात precaution dose घेतला आहे, तर 12-14 वयोगटातील 45 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. हे देखील नक्की वाचा: COVAXIN Booster Dose Trial चा अहवाल सकारात्मक; कोणत्याही गंभीर दुषपरिणामांशिवाय दीर्घ काळ सुरक्षित असल्याचा Bharat Biotech चा दावा .

Precaution Dose साठी पात्र कोण?

जी व्यक्ती 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची असेल, तर ती कोविड-19 विरूद्ध लसीचा Precaution Dose घेण्यास पात्र आहे.

Precaution Dose कधी घेऊ शकता?

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, ज्यांचे दुसरा डोस दिल्यानंतर 9 महिने पूर्ण झाले आहेत ते खाजगी लसीकरण केंद्रांमध्ये Precaution Dose साठी पात्र असतील.

Precaution Dose म्हणून कोणती लस देणार?

पहिल्या आणि दुसऱ्या डोसप्रमाणेच कोविड-19 चा Precaution Dose दिला जाईल. अद्याप 18 वर्षांवरील सर्व लसीकरणासाठी अंतिम मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत. म्हणजे पहिला,दुसरा कोविशिल्ड असेल तर प्रिकॉशनरी डोस म्हणूनही कोविशिल्ड दिला जाईल.

नोंदणी कुठे कराल?

कोविड-19 लसीच्या Precaution Dose साठी पात्र असलेले लोक Co-WIN पोर्टलला भेट देऊन, म्हणजे www.cowin.gov.in किंवा आरोग्य सेतू अॅपद्वारे अपॉइंटमेंट बुक करू शकतात. स्लॉट बुक करण्यासाठी लोकांना नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि आधार कार्डद्वारे साइन इन करावे लागेल.

Precaution Dose ची किंमत किती?

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, लोकांना त्यांच्या बूस्टर डोससाठी पैसे मोजावे लागणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे सीईओ, अदार पूनावाला यांनी देखील दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कोविशील्ड लसीच्या Precaution Dose ची किंमत प्रति शॉट 600 रुपये अधिक कर असेल. तर Covovax डोस घेतल्यांना 900 रुपये अधिक कर अशी किंमत मोजावी लागेल.

भारतामध्ये येत्या 10 जानेवारी 2022पासून कोविड 19 लसीकरण मोहिमेमध्ये बुस्टर डोस हा प्रिकॉशनरी डोस म्हणून देण्यास सुरूवात झाली आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स, 60 आणि त्याच्यावरील नागरिक ज्यांना सहव्याधी आहेत अशांना हा तिसरा डोस दिला जात होता नंतर सहव्याधीची अट देखील शिथिल झाली.