Coronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता
Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी लोकांना इंजेक्शनच्या माध्यमातून लस दिली जात आहे. मात्र भविष्यात टॅबलेट किंवा इनहेलरच्या रुपात लोकांना लस मिळण्याची शक्यता आहे. बीबीच्या एका रिपोर्ट्सनुसार, स्वीडन मधील सर्वाधिक मोठ्या सायन्स पार्कात इन्जेमो अँडरसनच्या नेतृत्वाखाली यावर काम करणे सुरु झाले आहे. त्या प्लास्टिक सारखे एक स्लिम इनहेलर तयार करत असून त्याचा आकार माचिस बॉक्सपेक्षा अर्धा असेल. त्यांच्या टीमला अशी अपेक्षा आहे की, हे लहान इनहेलर कोरोनाच्या विरोधात संपूर्ण जगाला लढण्यासाठी एक मजबूत हत्यार ठरु शकते. यासाठी इनहेलरच्या माध्यमातून लोकांना लस एका पाउडर वर्जनमध्ये सुद्धा घरी आणता येणार आहे.

फर्मचे सीईओ जोहन वोबोर्ग यांनी म्हटले, ही एकदम स्वस्त आणि सोप्प्या पद्धतीने होणारे तंत्रज्ञान आहे. त्याचा वापर खासकरुन अस्थमाचे रुग्ण करतात. पुढे असे म्हटले आहे की, या इनहेलरवर लावण्यात आलेली एक लहान प्लास्टिकची स्लिप काढून त्याचा वापर करु शकता. त्यानंतर आता ते अस्थमाचे रुग्ण ज्या प्रकारे पंपाच्या माध्यमातून त्याचा श्वास घेण्यासाठी वापर करतात त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा तसेच करायचे आहे.(COVID-19 In India: केंद्र सरकारने एकही व्हेंटिलेटर न वापरता ठेवलेला नाही; मीडीयात 13,000 व्हेंटिलेटर्स वापराविना ठेवल्याच्या वृत्तावर खुलासा)

Iconovo नावाच्या एका कंपनीने स्टॉकहोम मध्ये एक इम्यूनोलॉजी रिसर्च स्टार्टअप ISR सह करार केला आहे. त्यानुसार कोविड19 च्या विरोधात ड्रायपावडर तयार केली आहे. ती कोविड10 व्हायरस प्रोटीन्सचा वापर करतात. ही लस 40 डिग्री तपामानात सुद्धा ठेवली जाऊ शकते. तर डब्लूएचओ द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही लसींचा साठा करण्यास मोठी कसरत करावी लागते. त्यांना फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी काचेच्या एका मजबूत जारमध्ये 70 डिग्री सेल्सियस तापानात ठेवावे लागते. असे न झाल्यास लसीची प्रभावशीलता कमी होते.

ISR चे फाउंडर आणि कोरोलिंका इंस्टिट्युचे इन्यूनोलॉजीचे प्रोफेसर ओला विंकिस्ट यांनी म्हटले की, कोल्ड चेनच्या मदतीशिवाय लस सोप्प्या पद्धतीने ड्रिस्ट्रिब्युशन केल्यास मोठा फायदा होऊ शकतो. आणखी एक खासियत अशी की हेल्थकेअर प्रोवाइडर्सच्या मदतीसाठीशिवाय लोकांना दिले जाऊ शकते. ही लस एका टॅबलेट सारखी असू शकते.