Coronavirus Symptoms: नोवेल कोरोना व्हायरसने (Novel Coronavirus) संपूर्ण जगभरात आपले थैमान घातले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाटी सर्व पद्धतीच्या उपययोजना अयशस्वी ठरत आहेत. जगभरातील वैज्ञानिक अहोरात्र या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी ठोस उपाय शोधून काढत आहेत. मात्र कोरोनावरील लस येण्यास अद्याप चार महिने लागण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे. कोरोना व्हायरस संबंधित नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, याच्या लक्षणांमध्ये वाढ होत आहे. सुरुवातीला या महारोगाला SARS सारख्या श्वसनासंबंधित आजार असल्याचे मानले गेले होते. मात्र नंतर त्याची लक्षणे व्यक्तीला डोक्यापासून ते पायापर्यंत संक्रमित करत असल्यचे दिसून आले.
सामान्यपणे संक्रमित व्यक्तीला ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास, वास न येणे, डोके दुखी अशी लक्षणे जाणवतात. त्यामुळे जर तुमच्या नाकात जर ही दोन लक्षणे दिसल्यास ते कोरोनाचे संकेत ठरु शकतात.(Coronavirus Symptoms: त्वचेवर येणारे लाल चकत्ते देतात कोविड-19 संसर्गाचा संकेत; पहा, काय म्हणतात तज्ञ?)
>>नाकात दिसून येणारी कोविड19 ची ही दोन लक्षणे
कोरोना व्हायरसच्या संकटकाळात लोकांनी आपल्या घरातून बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. संक्रमणाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. याआधी श्वास घेण्यास त्रास, ताप आणि सुखा खोकला ही कोविड19 ची लक्षणे असल्याचे मानले जाते. मात्र हा व्हायरस आता विविध लोकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपले रुप दाखवत आहे.
येथे लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, वाहते नाक आणि बंद नाक कोरोनाचे विशिष्ट लक्षणे नाही आहेत. मात्र काही रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसुन येत आहेत. कोरोना व्हायरसची हलकी लक्षणे दिसून येणाऱ्या लोकांना वाहते नाक आणि बंद नाकची समस्या उद्धभवत आहे. त्यामुळे फ्लू किंवा सर्दीचे लक्षण असल्याचे समजले गले. पण नाकात दिसून येणारी ही दोन लक्षणे कोविड19 चे संकेत देऊ शकतात.
>>कशा पद्धतीने ओखळाल की हे कोविड19 चे संकेत आहेत?
जर तुम्हाला वाहते नाक आणि बंदची समस्या येत असल्यास त्याला ताप किंवा सर्दी असल्याची चुक करु नका. कारण हे कोविड19 चे सुद्धा संकेत असू शकतात. म्हणजेच तुमच्यात हलक्या स्वरुपात कोरोनाची लक्षणे जाणवू लागली आहेत. अशा स्थितीत तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधत त्यांचा सल्ला घ्या.(Coronavirus Pandemic :अस्थमा रुग्णांना COVID-19 मुळे होणाऱ्या मृत्यूचा कमी धोका, अभ्यासातून नवा खुलासा)
दरम्यान कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतीही ठोस उपलब्ध नाही आहे. त्यामुळे कोरोनाच्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी मास्क घालणे, सॅनिटायझरचा वारक करणे आणि सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करणे महत्वाचे आहे. कोविड19 च्या मार्गदर्शक सुचनांचे पालन केल्यास तुम्ही कोरोना पासून स्व:तासह दुसऱ्याला वाचवू शकता.