लहान मुलांसमोर मोठी माणसं जेव्हा चहा-कॉफी पितात तेव्हा त्यांनाही चहा-कॉफी पिण्याची इच्छा होते. अशा वेळी तू लहान आहेस असे सांगून मोठी माणसे लहान मुलांना चहा-कॉफी देण्यास टाळाटाळ करतात. मात्र काही जण मुलांच्या हट्टापुढे गुडघे देऊन त्याला चहा-कॉफी देतात आणि मग हळूहळू त्यांना त्याचे व्यसन लागते. पण तुम्हाला माहित आहे की 8 वर्षांखालील लहान मुलांना चहा-कॉफी दिल्यास त्यांच्या शरीरावर फार गंभीर परिणाम होऊ शकतात.
तसे पाहता जंक फूड, शीतपेय आणि चहा-कॉफी या तिन्ही गोष्टी लहान मुलांच्या शरीरास खूपच घातक आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कॉफीमध्ये भरपूर प्रमाणस कॅफीन असते. हा पदार्थक खूपच उत्तेजक असल्यामुळे तो लहान मुलांच्या शरीरास अपायकारक आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळे आजार होऊ शकतात. Children Health Tips: लहान बाळाचे पहिल्यांदा कान टोचल्यावर कशी घ्याल काळजी; वाचा घरगुती टिप्स
लहान मुलांना चहा-कॉफी दिल्यास होऊ शकतात हे परिणाम:
1. लहान मुलांना पोटदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.
2. चहा-कॉफी प्यायल्याने त्यांना झोप लागत नाही.
3. लहान मुलांच्या हृदयाचे ठोके वेगाने होतात.
4. तसेच खूप कमी वयात त्यांना डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते.
शक्यतो लहान मुलांना 8 वर्षानंतर आणि जमल्यास 16 वर्षानंतर चहा-कॉफी देणे अधिक चांगले. जमेल तितके त्यांना चहा-कॉफीपासून दूर ठेवा आणि त्यापेक्षा फायद्याचे आणि पोषक असे दूध रोज प्यायला द्या.
जर तुम्ही तुमच्या मुलांना कोल्ड्रिंक्स, कॉफी, फ्लेवर्ड फ्रूट ड्रिंक्स यांपासून दूर ठेवला नाहीत तर त्यांच्या शरीरावर त्याचा विपरित होऊ शकतो. यात काहींना खूप त्वरित तर काही काही काळानंतर अनेक गंभीर परिणामांना आणि आजारांना सामारे जावे लागू शकते.