बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी या तीन गोष्टी खाण्यासोबत व्यायामसुद्धा करा, लवकरच परिणाम दिसतील
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

आयुष्यात काही गोष्टींमध्ये यश मिळवण्यासाठी शरीरासह आपले बुद्धी तंदुरुस्त असणे फार गरजेचे असते. तसेच आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायामाची सुद्धा तितकीच गरज असते. जर तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता वाढवायची आहे तर या तीन गोष्टी जरुर खा. त्याचसोबत व्यायामसुद्धा करा.

बहुधा आपण शालेय विद्यार्थ्यांना त्यांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी विविध प्रकारचे उपाय करतो. मात्र त्यामधून काही साध्या होत नाही. परंतु नैसर्गिकरित्या सुद्धा प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता वाढण्याची क्षमता असते. त्यामुळे नेहमी आरोग्यवर्धक असा आहार घेतल्यास त्याचे परिणाम आरोग्यावर दिसून येतात. तर खासकरुन या तीन गोष्टी जरुर खा.

अश्वगंधा-

प्राचीन काळापासून अश्वगंधा ह्याचा उपयोग व्यक्तीमध्ये असलेला ताणतणाव कमी करण्यासाठी केला जातो. याच्या मदतीने स्ट्रेस हार्मोन कमी केले जातात. तर बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी एक चमचा अश्वगंधा पावडर रात्री झोपताना 30 मिनिटे अगोदर गरम दूधातून घ्यावी.

अक्रोड-

अक्रोड तुमच्या हृदयाची प्रकिया सुरळीत ठेवण्यासोबत तुमची बुद्धिसुद्धा मजबूत करण्यास प्रयत्न करतो. तर अक्रोड मध्ये असलेल्या इनोलेनिक अॅसिडसह अन्य पोषक तत्वे त्यामध्ये असतात. जे मेंदूला पर्याप्त प्रमाणात ऑक्सिजन पोहचवून रक्तसंचार वाढवण्याचे काम करते. त्यामुळे तुमची बुद्धिमत्ता अधिक मजबूत होते.

(मसालेदार आहाराच्या सेवनाने हृदय करा तंदुरुस्त ,जाणून घ्या तिखट खाण्याचे पाच हटके फायदे)

ब्लूबेरी-

ब्लूबेरी मध्ये अॅन्टीऑक्साईड भरपूर प्रमाणात असतात. ते बुद्धिसाठी फार उपयुक्त असतात. त्यामुळे तुमची एकाग्रता वाढवण्यास फार मदत करतात.

तसेच या आरोग्यदायी गोष्टी खाण्यासोबत व्यायाम करणे सु्द्धा आवश्यक असते. त्यासाठी दिवसातील कमीत कमी अर्धा तास वेळ काढला पाहिजे.

टीप: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारीत आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.