Bone Health Care: थंडीचे दिवस सुरु झाले की वातावरणात गारवा निर्माण होतो. त्यामुळे काही जणांचे स्नायू हिवाळ्यात आखडले जातात. यामागे काही विविध कारणे ही असू शकतात. तर उन्हाळ्यापेक्षा थंडीच्या दिवसात लोक व्यायामाकडे दुर्लक्ष करतात. मात्र थंडीच्या काळात आरोग्यासाठी विटामिन- डी हाडांसाठी उत्तम स्रोत मानला जातो. तसेच हिवाळ्यात सूर्याची किरणे ही कमी पडत असल्याने लोकांच्या शरीरात विटामिन डी ची कमतरता भासते. अशातच काही जणांची हाडे दुखून त्यांना वेदना होतात.
हिवाळ्यात जर तुम्हाला तुमचे स्नायू तंदुरुस्त ठेवायचे असल्यास काही गोष्टी नक्की फॉलो कराव्या लागतील. तसेच या दिवसात योग्य आहार सुद्धा तितकाच महत्वाचा ठरणार आहे. तर जाणून घ्या थंडीच्या दिवसात तुम्ही हाडांची काळजी कशी घ्याल.(Health Tips: थंडीमुळे एलर्जी किंवा वारंवार सर्दी होत असेल तर जाणून घ्या 'हे' सोपे घरगुती उपाय)
>>व्यायाम- शरिराला नेहमीच अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी काही ना काही कामे करणे महत्वाचे आहे. त्यासाठी सध्या फिटनेटकडे अधिक लक्ष दिले जात आहे. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा थंडीच्या दिवसात थोडा वेळ काढून व्यायाम केल्यास तुमचे स्नायू दुखण्यासह जर ते आखडले असल्यास ते मोकळे होतील.
>>संतुलित डाएट- स्नायूंची काळजी घेण्यासाठी काही महत्वाच्या पोषक तत्वांची गरज असते. विटामिन-डी आणि कॅल्शिअम असे दोन महत्वाचे पोषक तत्त्वे असून हाडांना बळकटी देण्याचे काम करतात. खाताना अशा गोष्टा खा ज्या मधून विटामिन-डी, कॅल्शिअम, प्रोटीन, विटामिन-सी, प्री-बायोटिक आणि विटामिन-के यांचा समावेश असावा.
>>योग्य पद्धतीने बसा- लॉकडाऊनच्या कारणास्तव बहुतांश लोक घरातून काम करत आहेत. त्यामुळे एकाच जागेवर खुप वेळ बसल्याने शरीर दुखते किंवा ते आखडले जाते. अशा वेळी पाठ आणि स्नायूंना आराम मिळेल अशा योग्य पद्धतीने बसा.(Winter Health Tips: हिवाळ्याच्या दिवसांमध्ये निरोगी, तंदुरुस्त आणि सुरक्षित कसे रहाल)
>>कॅफेनचे सेवन कमी करा- कॅफेनचे सेवन हे शरीराच्या माध्यमातून कॅल्शिअमचे शोषण करण्यामध्ये अडळथा आणू शकते. तर शरिरातील पुरेश्या प्रमाणात कॅल्शिअम नसल्याने हाडे कमकूवत होतात. त्यामुळे कॅफनचे सेवन कमी करा किंवा आपल्या कॉफित दूधाचा वापर करा.
तर वरील काही सोप्प्या टीप्स वापरुन तुम्ही थंडीच्या दिवसात आपल्या शरिरातील हाडांची काळजी घेऊ शकतात. तसेच सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता थंडीच्या काळात स्वत:सह परिवाराची काळजी घ्या.