फिटनेस बाबत सध्या प्रत्येकजण अॅक्टिव्ह होत असल्याचे दिसून येत आहे. महिलासुद्धा फिट राहण्यासाठी जिम मध्ये वर्कआउट करतात. यामध्ये फक्त जिमच नाही तर योगा, झुंबा, पावर योगासारखे फिटनेस संबंधित गोष्टी केल्या जातात. व्यायाम केल्याने फक्त स्किन टोन नाही तर तुम्ही प्रदीर्घ काळासाठी फिट आणि अॅक्टिव्ह राहता. जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर खाण्यापिण्यासह अन्य काही गोष्टींबाबत सुद्धा लक्ष देणे अत्यावश्यक आहे.
व्यायामावेळी कपडेच नव्हे तर अंतर्वस्र सुद्धा योग्य पद्धतीची निवडणे गरजेचे आहे. जणेकरुन तुमच्या शरीराची बांधणी योग्य रहावा. काही महिला या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असून काही वेळेस अंतर्वस्र कशा पद्धतीची निवडावी याबाबत गोंधळतात. मात्र जर तुम्ही अंतर्वस्रमध्ये ब्रा ही योग्य पद्धतीची न निवडल्यास त्याचे काही परिणाम होऊ शकतात. त्यामुळेच व्यायाम करताना नेहमी स्पोर्ट्स ब्रा घालणे हे उत्तम मानले जाते. तर जाणून घ्या स्पोर्ट्स ब्रा घालण्याचे नेमके फायदे काय आहेत.
>>वर्कआउट करताना नेहमीच सैल कपडे घालावे हे लक्षात असू द्या. त्यामुळे तुम्हाला वर्कआउट करताना आरामदायी वाटेल. व्यायाम करताना स्पोर्ट्स ब्रा घालण्याचा सल्ला दिला जातो. कारण तुमच्या ब्रेस्टला एक योग्य प्रकारे सपोर्ट मिळून त्याचा शेप कायम राहतो. -
>>तसेच एका उत्तम दर्जाची स्पोर्ट्स ब्रा घातल्याने पूर्णपणे तुमच्या ब्रेस्टला आधार मिळतो. त्यामुळे तुमची ब्रेस्ट शेप मध्ये राहून खाली गळल्यासारखे वाटणार नाही.
>>ज्या वेळी तुम्ही व्यायाम करता त्यावेळी पूर्ण जोर तुमच्या शरीरावर येतो. अशावेळी पूर्ण शरीरासह ब्रेस्ट काही वेळेस दुखतात. त्यामुळेच स्पोर्ट्स ब्रा घालणे हा उत्तम पर्याय आहे.(व्यायाम करायला वेळ नाही? मग डान्स करा वजन घटवा! सुडौल बांधा, Sexy Figure कमावण्यासाठी हटके स्टेप्स)
तर जिमला जाताना महिलांना तसेच ब-याच मुलींना मेकअप करुन जाण्याची सवय असते. आपण नेहमी सुंदर दिसावे किंवा वर्कआऊट करतानाचे फोटो काढताना आपले फोटो छान यावेत यासाठी मेकअप करणे हे महिलांचे पहिले काम असते. पण तुम्हाला माहित आहे का असे करणे तुमच्या शरीरासाठी विशेषत: तुमच्या चेह-यासाठी त्रासदायक ठरु शकते.