Winter Health Tips: थंडीच्या दिवसांत बारीक मेथीची भाजी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?
Baby Fenugreek Leaves (Photo Credits: Instagram)

थंडीत शक्यतो उष्ण पदार्थ, भाज्या आर्वजून खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे थंडीपासून तुमचा बचाव होतो. सुकामेव्यासह बाजारात अशा काही भाज्या आहेत ज्या उष्ण असतात. त्यातीलच मेथीतील एक प्रकार म्हणजे बारीक मेथीची भाजी (Baby Fenugreek Leaves)..... आपल्याला बाजारात हिरव्या मेथीची जुडी अगदी सहज उपलब्ध होते. मात्र बारीक मेथीची भाजी क्वचितच पाहायला मिळते. मात्र या भाजीतही खूप चांगले गुणधर्म आहेत. ज्यामुळे थंडीपासून आणि आजारांपासून तुमचा बचाव होतो.

या भाजीमध्ये व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. तसेच यामुळे पोटाचे विकार दूर होण्यासही मदत होते. बारीक मेथीची भाजी थंडीत खाल्ल्यास आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत होते. बारीक मेथीची भाजी खूप चविष्ट आणि पौष्टिक असते.

बारीक मेथीचे भाजी खाण्याचे फायदे

1. पचनक्रिया

बारीक मेथीची भाजी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्टता, पोटाचे विकार दूर होतात.

2. त्वचा

चेह-यावर मूर्म आले असतील तर कमी करण्यास, त्वचा नितळ ठेवण्यास मदत होते.हेदेखील वाचा- Winter Skin Care Tips: थंडीत अंगाला सुटणारी खाज कमी करण्यासाठी काय कराल?, जाणून घ्या काही सोप्प्या घरगुती टिप्स

3. मधुमेह

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. रक्तातील ग्लुकोज होमोस्टॅसिसचे प्रमाण संतुलित राहते.

4. केस मजबूत राहण्यास मदत

बारीक मेथी खाल्ल्यास आपली केसांची मूळं मजबूत होतात. त्यामुळे केस गळणे, तुटणे हा समस्या उद्भवत नाही.

त्यामुळे थंडीत तुम्हाला बाजारात बारीक मेथी उपलब्ध झाल्यास त्याची भाजी करुन अवश्य खा. ही भाजी बनवणेही अतिशय सोपी आहे. थंडीत ही भाजी खाल्ल्यास शरीरास अनेक हितवर्धक फायदे होतात हे मात्र नक्की!

(टीप- या लेखात दिलेली माहिती ही केवळ आरोग्याशी संबंधित माहितीच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी याचा आधार घेऊ नये. आम्ही असा दावा करू शकत नाही की, लेखात नमूद केलेल्या टिप्स उत्तम प्रकारे कार्य करतील, म्हणून लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचना अवलंबात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)