Joint pain

 Joint pain: हिवाळ्यात किंवा पावसात सांधे किंवा पाठदुखी वाढते असे अनेकदा सांगितले जाते. पण ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी एका संशोधनानंतर यात तथ्य नसल्याचे सांगितले आहे.हवामान बदलले की, सांधे किंवा स्नायूंच्या वेदना वाढतात असा जुना समज आहे. ऋतूनुसार सांधेदुखीचा त्रास वाढू किंवा कमी होऊ शकतो, असे अनेकांचे म्हणणे आहे. पण नुकत्याच झालेल्या अभ्यासानंतर शास्त्रज्ञांनी या समजाला आव्हान दिले आहे. ऑस्ट्रेलियन संशोधकांना सांधेदुखी आणि हवामानाचा कोणताही संबंध आढळला नाही. संशोधकांना असे आढळून आले की, उच्च तापमान आणि कमी आर्द्रतेमध्ये संधिरोगाचा धोका दुप्पट होऊ शकतो. त्यांच्या संशोधनात त्यांना असे आढळून आले की, उन्हाळ्याच्या काळात शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे संधिरोगाच्या रुग्णांमध्ये युरिक ऍसिडचे प्रमाण वाढते.

तापमानाशी संबंधित नाही

जगभरातील मोठ्या संख्येने लोक सांधेदुखीने त्रस्त आहेत. एकट्या ऑस्ट्रेलियात त्यांची संख्या लोकसंख्येच्या एक चतुर्थांश आहे. त्यांच्या संशोधनाद्वारे, शास्त्रज्ञांनी या वेदनांवर हवामानाचा परिणाम होतो या सामान्य समजाला आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, सांधेदुखीबाबत अनेक गैरसमज असून त्यावर उपचाराचे पर्याय फार कमी आहेत.

सिडनी विद्यापीठाने जारी केलेल्या निवेदनात, संशोधक प्रोफेसर मॅन्युएला फरेरा यांनी सांगितले की, "लोक सामान्यतः असा विश्वास करतात की पाठ, नितंब किंवा सांधेदुखी आणि संधिवात वेदना एका विशिष्ट ऋतूमध्ये वाढतात. आमचे संशोधन या समजाला आव्हान देते. "पाऊस असो वा हिवाळा, हवामानाचा आपल्या बहुतेक वेदनांशी काहीही संबंध नाही.”

सिडनीच्या कॉलिंज इन्स्टिट्यूटमधील प्रोफेसर फरेरा आणि त्यांच्या टीमने मस्क्यूकोस्केलेटल वेदनांवर आतापर्यंत केलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय अभ्यासांमधील डेटाचे विश्लेषण केले. सुमारे 15 हजार रुग्णांच्या या डेटामध्ये वाढलेल्या वेदनांच्या 28 हजारांहून अधिक प्रकरणांचा समावेश आहे. यापैकी बहुतेक प्रकरणे गुडघा किंवा हिप संधिवात ही  होती. त्यानंतर, पाठीच्या खालच्या भागात सर्वात जास्त वेदना आढळल्या.

हवामानावर अवलंबून राहू नका

विश्लेषणात, शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, हवेच्या तापमानात बदल, आर्द्रता किंवा दाब किंवा पावसामुळे वेदना वाढण्याच्या प्रकरणांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच हवामान बदलले की, वेदना उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली किंवा कमी झाली असे झाले नाही. त्यात कोणताही बदल झाला नाही.

सांधे किंवा स्नायू दुखणे हवामानाशी संबंधित आहे की नाही हे शोधणारा हा पहिला अभ्यास आहे. संशोधक म्हणतात की त्यांचे परिणाम हे सिद्ध करतात की, हवामान बदलण्याची वाट पाहत असताना ते रुग्णांना त्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका असा इशारा देखील देतात.

प्रोफेसर फरेरा म्हणतात, "वेदना निवारणासाठी, रुग्ण आणि डॉक्टरांनी वजन कमी करणे आणि व्यायाम यासारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि हवामान बदलत असताना वेदना कमी होण्याची वाट पाहू नये."