Dr Asuri Krishna, Chief Surgeon, AIIMS Delhi (Photo/ANI)

दिल्ली येथील एम्स रुग्णालयात (AIIMS Delhi) दाखल झालेल्या आणि दुर्मिळ आजाराने गस्त असलेल्या 17 वर्षीय मुलावरील दुर्मिळ शस्त्रक्रिया (Rare Surgery) यशस्वी करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. हे बालक अतिरिक्त अवयवांनी त्रस्त होते. ज्याला अपूर्ण परजीवी जुळे (Parasitic Twin) असेही म्हटले जाते. पाठिमागील अनेक वर्षांपासून आजारांनी ग्रस्त असलेल्या या मुलावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन त्याचे अतिरिक्त हात आणि पाय काढून टाकले आहेत. ही एक अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया (Complex Surgery) होती. मात्र, अथक मेहनत करुन डॉक्टरांनी त्यात यश मिळवले. अशा प्रकारची शस्त्रक्रिया एक उच्च-जोखीम प्रक्रिया मानली जाते. मात्र, ती कोणत्याही गुंतागुंतीशिवाय पूर्ण झाली, जी वैद्यकीय विज्ञान आणि पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण यश म्हणून ओळखली जात आहे.

अपूर्ण परजीवी जुळे

मुलाची स्थिती अतिशय हृदयद्रावक होती. त्यास जन्मात:च अतिरिक्त हा पाय होते. ज्याला अपूर्ण परजीवी जुळे म्हणून ओळखले जाते. वैद्यकशास्त्रात सांगतात की, अशी परिस्थिती तेव्हाच उद्भवते जेव्हा एक अविकसित जुळे पूर्णपणे तयार होत नाही परंतु यजमान जुळ्याशी जोडलेले राहते. यजमानाच्या शरीरातून पोषक तत्वे आणि रक्तपुरवठा घेते. एम्स दिल्ली येथील मुख्य शल्यचिकित्सक डॉ. असुरी कृष्णा यांनी अशा प्रकरणांमध्ये येणाऱ्या आव्हानांबद्दल स्पष्टीकरण दिले:

मुख्य शल्यचिकित्सक डॉ. असुरी कृष्णा म्हणाले, या स्थितीला आपण अपूर्ण परजीवी जुळे म्हणतो. जुळे पूर्णपणे विकसित होत नाहीत परंतु यजमानाचे पोषण करत राहतात. अशा दुर्मिळ  शस्त्रक्रिया करताना आव्हान म्हणजे त्याचा रक्तपुरवठा, मज्जातंतूंचे कनेक्शन आणि अंतर्गत जोड ओळखणे. सुदैवाने, या प्रकरणात, यकृत, आतडे किंवा कोलनशी कोणतेही मोठे जोड नव्हते, ज्यामुळे शस्त्रक्रिया तुलनेने सुरक्षित झाली. (हेही वाचा, )

शस्त्रक्रिया आणि गुंतागुंत

परजीवी जुळ्यांना जोडलेल्या मोठ्या रक्तपुरवठ्यामुळे शस्त्रक्रिया विशेषतः गुंतागुंतीची होती. एम्समधील बर्न अँड प्लास्टिक सर्जरीमधील तज्ज्ञ डॉ. मनीष सिंघल यांनी आव्हानांवर प्रकाश टाकला:

  • डॉ. मनीष सिंघल म्हणाले, सर्वात मोठे आव्हान म्हणजे परजीवी अवयवांचा आकार आणि त्यांचा अंतर्गत प्रसार. सीटी स्कॅन आणि अल्ट्रासाऊंडमध्ये जुळ्या मुलांमध्ये 1.5 लिटरपेक्षा जास्त रक्त प्रवाहित झाल्याचे दिसून आले. यामुळे प्रक्रियेदरम्यान अचानक रक्त कमी होण्याचा धोका निर्माण झाला. तथापि, कोणत्याही गुंतागुंतीशिवाय शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आम्हाला अधिक सुरक्षीत वाटले.
  • एम्स दिल्लीच्या शस्त्रक्रिया विभागातील प्राध्यापक डॉ. व्ही. के. बन्सल यांनी शस्त्रक्रियेपूर्वीच्या सुरुवातीच्या चिंता व्यक्त केल्या:
  • डॉ. व्ही. के. बन्सल यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही पहिल्यांदा रुग्णाची तपासणी केली, तेव्हा आम्हाला हे निश्चित करावे लागले की परजीवी अवयव हृदय, यकृत किंवा आतड्यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांशी जोडलेले आहेत का. अशा जोडण्या शस्त्रक्रिया अधिक गुंतागुंतीच्या आणि धोकादायक बनवल्या असत्या. सुदैवाने, असे कोणतेही कनेक्शन आढळले नाहीत, ज्यामुळे आम्हाला सुरक्षितपणे पुढे जाता आले."

दरम्यान, आव्हानांना न जुमानता, शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाली आणि रुग्ण आता बरा होत आहे. डॉ. कृष्णा यांनी शस्त्रक्रिया यशस्वी पूर्ण होणे आणि त्यानंतर रुग्णाने चांगला प्रतिसाद देणे याबाबत समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, 16-17 वर्षांचा रुग्ण आता चांगल्या स्थितीत आहे. शस्त्रक्रियेनंतर तो अत्यंत आनंदी होता, कारण त्यामुळे त्याच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली आहे. डॉक्टरांनी देखील या स्थितीच्या भावनिक परिणामाची कबुली दिली, कारण मुलाला त्याच्या अतिरिक्त अवयवांमुळे वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागला. डॉ. बन्सल यांनी सामाजिक आणि मानसिक परिणामांवर भर देत म्हटले: मुलाला इतकी वर्षे या आजारासोबत जगावे लागले हे हृदयद्रावक आहे. अशा प्रकरणांना आधार देण्यासाठी आणि वेळेवर वैद्यकीय हस्तक्षेप करण्यासाठी आपल्या समाजाला चांगल्या यंत्रणेची आवश्यकता आहे.