Happy Friendship Day 2021 HD Images: सर्व नात्यांपैकी मैत्रीचे नाते सर्वात विशेष आणि महत्वाचे मानले जाते. मैत्रीच्या नात्याला वय, लिंग, वर्णासह अन्य कशाचेही बंधन नसते. आयुष्यात मित्र नसतील तर, जीवन व्यर्थ आहे, असेही म्हटले जाते. या नात्याला आणखी घट्ट करण्यासाठी तरूणांपासून तर जेष्ठापर्यंत प्रत्येकजण मोठ्या उत्सहात फ्रेंडशिप डे साजरा करतात. या दिवशी मित्र-मैत्रिणी एकमेकांच्या हातावर फ्रेन्डशिप बॅन्ड बांधून मैत्रितील विश्वास वाढवतात. सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट वावरत आहे. यामुळे यावर्षीही कोरोना नियमांचे पालन करून फ्रेंडशिप डे साजरा करावा लागणार आहे. परंतु, या पवित्र नात्यातील गोडवा कायम ठेवण्यासाठी खालील एचडी इमेज महत्वाचे ठरणार आहेत.
फ्रेंडशिप डे जगभरातील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. तथापि, पराग्वे हा असा देश आहे, जिथे सर्वप्रथम 1958 मध्ये आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानंतर डॉ. रमन आर्टेमिओ यांनी 20 जुलाई 1958 डिनर पार्टी आयोजित केली होती, ज्यात त्यांनी मित्रांना फ्रेंडशिप डे साजरा करण्याची कल्पना दिली. पराग्वे मधील लोकांनी हे ऐकले तेव्हा जगात फ्रेंडशिप डे साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. पराग्वे मध्ये, हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पण, भारतात ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. हे देखील वाचा-Happy Friendship Day Messages 2021: 'फ्रेंडशिप डे'च्या निमित्ताने खास Quotes, Wishes, Images, Greetings च्या माध्यमातून मित्रासमोर व्यक्त करा आपल्या भावना





मैत्रीचा धागा या आपल्या भावनिक विश्वावर बर्याच अंशी अवलंबून असतो. त्यामुळे तो जपताना कधी, किती ताणायचा? आणि कधी किती मोकळा सोडायचा याचे गणित जीवनातील अनेक लहान मोठे अनुभव तुम्हांला आयुष्यभर देणार आहेत. ते स्वीकारायला शिका. तुमच्या आयुष्यात असलेली मित्रमंडळी कायम तुमच्या सोबत राहोत, त्यामध्ये वाढ होत राहो हीच आमची सदिच्छा! हॅप्पी फ्रेंडशिप डे!