Happy Friendship Day Messages 2021: 'फ्रेंडशिप डे'च्या निमित्ताने खास Quotes, Wishes, Images, Greetings च्या माध्यमातून मित्रासमोर व्यक्त करा आपल्या भावना
Happy Friendship Day 2021 (File Image)

Happy Friendship Day Messages in Marathi: मैत्री (Friendship) या शब्दाला आपल्या प्रत्येकाच्याच जीवनात खास महत्व असते. कुटुंबानंतर जे नाते आपण आयुष्यभर सांभाळतो ते म्हणजे ‘मैत्री’ होय. तर अशा मैत्रीचाही एक खास दिवस आहे, जो ‘फ्रेन्डशिप डे’ (Friendship Day 2021) म्हणून साजरा केला जातो. फ्रेंडशिप डे किंवा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन हा प्रत्येक वर्षी ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. 2021 मध्ये, फ्रेंडशिप डे 1 ऑगस्टला येत आहे. आपल्या जीवनात मित्रांची किती मोठी भूमिका असते हे सर्वांनाच ठाऊक आहे, अशा वेळी, त्यांच्या नावानेही एक दिवस साजरा करणे तर बनतेच. त्यामुळे जगभरात ‘फ्रेंडशिप डे’ हा मैत्रीचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.

असे सांगितले जाते की, 1935 मध्ये अमेरिकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, ज्याचा दोष सरकारवर होता. या दरम्यान आपल्या मित्राच्या मृत्यूमुळे दुखावलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीनेही आत्महत्या केली. त्यानंतर अमेरिकेत हा दिवस फ्रेंडशिप डे म्हणून साजरा व्हायला सुरुवात झाली. तर तुमच्या मित्रांना तुम्ही या मैत्रीदिनानिमित्त खास Wishes, Images,  Quotes, WhatsApp Status, Messages, HD Images च्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता.

बंधनापलीकडे एक नाते असावे,

शब्दांचे बंधन त्याला नसावे,

भावनांचा आधार असावा,

दु:खाला तिथे थारा नसावा,

असा गोडवा मैत्रीत असावा

हॅप्पी फ्रेंडशिप डे!

Friendship Day 2021

गाण्याला मैफलीची गरज असते

प्रेमाला हृदयाची गरज असते

दोस्तांशिवाय आयुष्य अपूर्ण आहे

कारण मित्रांची गरज प्रत्येक क्षणाला असते

हॅपी फ्रेंडशिप डे!

Friendship Day 2021

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,

आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,

दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,

न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,

ती म्हणजे मैञी असते

मैत्रीदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Friendship Day 2021

मैत्री नावाच्या नात्याची,

वेगळीच असते जाणीव

भरून काढते आयुष्यात,

प्रत्येक नात्यांची उणीव

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Friendship Day 2021

रक्ताची नाती जन्माने मिळतात,

मानलेली नाती मनाने जुळतात,

पण नाती नसतानाही जी बंधने जुळतात,

त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात

Happy Friendship Day!

Friendship Day 2021

दुसरीकडे असेही मानले जाते की, 1919 मध्ये हॉलमार्क कार्ड्सचे संस्थापक अमेरिकन उद्योगपती जोस हॉल यांच्या मनात, मैत्रीचे नाते साजरे करण्यासाठी खास दिवस साजरा करण्याची कल्पना आली 1935 मध्ये, युनायटेड स्टेट्स काँग्रेसने ऑगस्टच्या पहिल्या रविवारी तो साजरा करण्याची घोषणा केली. यामुळे, भारत आणि इतर अनेक देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जाऊ लागला, अनेक देशांमध्ये हा दिवस 30 जुलै रोजी साजरा केला जातो. सुरुवातीला या दिवशी आपल्या मित्रांना भेटवस्तू आणि शुभेच्छापत्रे पाठवली गेली होती.

मैत्री या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. हे नाते असे आहे जे फक्त भावनेवर पुढे जाते. मैत्री कुणाचीही कोणाशीही असू शकते. मैत्रीला कोणतीही बंधने नसतात. वयाची मर्यादा नसते. त्यामुळे प्रत्येकाला एकतरी जवळचा, खास मित्र नक्की असावा.