भारतामध्ये विविध ऋतूनुसार अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. श्रावणापासून देशात अनेक सणांची रेलचेल पाहायला मिळते. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मोठ्या उत्साहात गोकुळाष्टमी (Gokulashtami) म्हणजे कृष्ण जन्म दिवस (Krishna Janmashtami) साजरा केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देशभरात दहीहंडीचा (Dahi Handi 2020) उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो. दहीकाला खाऊन गोकुळाष्टमीचा उपवास सोडण्याची प्रथा आहे. याच दिवशी ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्याचीदेखील प्रथा आहे. यंदाच्या प्रत्येक उत्सवावर कोरोना विषाणूचे सावट असल्याने, यावर्षी अनेक मंडळांनी दहीहंडी साजरी न करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.
श्रीकृष्णाला दही, लोणी, दुध-तूप यांची आवड होती. लहानपणी यशोदा या गोष्टी त्याच्यापासून लपवून उंच शिंक्यावर ठेवत असे. मात्र आपल्या मित्रांच्या मदतीने बाळकृष्ण तिथपर्यंत पोहचून त्या गोष्टी फस्त करत असे. अशाप्रकारे या गोष्टींचे प्रतिक म्हणून गोकुळाष्टमी नंतर दहीहंडी हा सण साजरा केला जातो. तर यंदाच्या दहीहंडी उत्सवानिमित्त तुम्ही Wishes, Messages, GIFs, Whatsapp Status, Facebook, HD Images यांच्या सहाय्याने शुभेच्छा पाठवून साजरा करू शकता गोपालकाल्याचा सण.
दहीहंडी उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
दहीहंडीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दहीहंडी उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!
दहीहंडीच्या शुभेच्छा!
दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
दहीहंडीच्या दिवशी एका मातीच्या मटक्यामध्ये पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी यांचे मिश्रण भरून, हे मडके उंचावर टांगले जाते. त्यानंतर तरुण एकमेकांच्या खांद्यावर मनोरा रचून हे मडके फोडण्याचा प्रयत्न करतात. (हेही वाचा: दहीहंडी च्या शुभेच्छा मराठी Messages, GIFs, Whatsapp Status मधुन शेअर करत गोपाळकाला करु साजरा)
दरम्यान, वृंदावनमध्ये जन्माष्टमी व गोपाळकाला असे दोन्ही सण साजरे होतात. मात्र यंदा वृंदावन येथील इस्कॉन मंदिराचे (ISKCON Temple) पुजारी यांच्यासह 22 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर मंदिर सील करण्यात आले आहे.