Dahi Puri | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबईच्या रस्त्यावरुन फिरता आपणास विविध पदार्थांची रेलेचेल असलेली दुकाने रस्त्यारस्त्यांवर दिसतात. त्यात प्रामुख्याने वडापाव (Vada Pav), दहीपुरी (Dahi Puri) , बॉम्बे सँडविच (Bombay Sandwich), पोहो, इडली, मेदूवडा, चहा, दुपारचे जेवण असा विविध गोष्टी दिसतात. पण तुम्हाला माहिती आहे का, रस्त्यावर मिळणाऱ्या खराब पदार्थांची म्हणजेच  Worst Indian Street Food बाबत नुसताच एक सर्व्हे झाला. ज्यामध्ये रस्त्यावरील खराब असलेल्या टॉप 10 पदार्थांची निवड करण्यात आली.

'टेस्ट ऍटल्स'ने याबाबत वृत्त दिले आहे. त्यानुसार ही यादी निवडण्यासाठी 17 ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्यात आली. ज्यात 2,508 रेटिंगचा समावेश होता. यापैकी फक्त 1,773 अधिकृत रेटींग माणण्यात आले. टॉप 10 यादीमध्ये खराब स्ट्रीट फूडमध्ये खालील पदार्थांचा समावेश आहे.

दाबेली (Dabeli)

दही पुरी पाठोपाठ दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे गुजरातमधील दाबेली (Dabeli) या पदार्थाचा. सर्व्हेतील सहभागींच्या मते दाबेली हा दुसऱ्या क्रमांकाचे खराब स्ट्रीटफूड आहे.

बॉम्बे सँडविच (Bombay Sandwich)

रस्त्यावर मिळणारा एक हेल्दी पदार्थ म्हणून कितीही कौतुक केले तरी लोकांना मात्र हा पदार्थ तितकासा चांगला वाटत नाही. खराब स्ट्रीट फूडच्या यादीत या पदार्थाने चौथा क्रमांक पटकावला आहे.

अंडा भुर्जी, दही वडा (Egg Bhurji, Dahi Vada)

दहीपुरी, दाबेली, बॉम्बे सँडविच यांच्या खालोखाल नागरिक अंडा भुर्जी आणि दही वडा रस्त्यावरील सर्वात खराब पदार्थ असल्याचे सांगतात. शिवाय पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये प्रसिद्ध असलेली आणि भारतात मिळणारी पापडी चाट (Papri Chaat) देखील नागरिकांना आवडले नाही. ज्यामुळे पापरी चाट या यादीत सातव्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, पंजाबची प्रसिद्ध डीश म्हणून ओळख असलेला गोबी पराठा (Gobi Paratha) सुद्धा लोकांना फारसा आवडला नाही. ज्यामुळे खराब स्ट्रीट फूडच्या यादीत तो शेवटच्या म्हणजेच 10 व्या स्थानावर आहे.