How to Make Baingan Bharta: निखाऱ्यावर भाजून बनवलेले मसालेदार वांग्याच्या भरीताची 'ही' रेसिपी तुम्हाला माहित आहे का? Watch Video
Baingan Bharta Recipe (PC - Twitter)

How to Make Baingan Bharta:अनेकांना वांगी खायला आवडतात. वांग्याच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवून त्याचा आस्वाद चाखणारे अनेक फूडी लोक आहेत. ते त्यांच्या आहारात वांग्याचा वेगवेगळ्या स्वरूपात समावेश करतात. विशेषत: हिवाळ्यात लोकांना वांग्याचे भरीत खायला खूप आवडते. यासोबत जर गरमागरम बाजरीची भाकरी असेल तर ही चव अफलातून असते. तुम्ही आतापर्यंत निखाऱ्यावर भाजलेल्या वांग्याचं भरीत खाल्लं आहे का? या मसालेदार वांग्याच्या भरीताची रेसिपी अगदी सोप्पी आहे.

तुम्ही या पद्धतीने वांग्याचं भरीत बनवून अगदी अस्सल गावरान भरताची चव चाखू शकता. निखाऱ्यावर भाजलेल्या वांग्याच्या भरीताची रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला खालील व्हिडिओची नक्की मदत होईल. चला तर मग अस्सल गावरान पद्धतीनं बनवलेलं वांग्याचं भरीत रेसिपी जाणून घेऊयात. (वाचा - AYUSH Ministry On Ardraka Paka: आयुष मंत्रालयाने दिला आलेपाक खाण्याचा सल्ला, Ginger बर्फी खाण्याचे फायदे घ्या जाणून)

वांग्याच्या भरीत रेसिपी -

सर्वात आधी काळी वांगी घ्या. ही वांगी निखाऱ्यावर भाजून घ्या. वांगी भाजल्यानंतर त्यावरील काळ्या रंगाचे टरफले काढून टाका. त्यानंतर वांग्याच्या आतील पांढऱ्या रंगाचा गर काढा. एक टॉमॅटो आणि कांदा बारीक कापून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात जिरे बारीक केलेली मिरची, कढीपत्ता टाका. मिरची भाजल्यानंतर त्यात कांदा आणि टॉमॅटो टाका. कांदा आणि टॉमॅटो भाजल्यानंतर त्यात भाजलेले वांगे टाका. चवीनुसार मीठ टाकून हे हलवा. त्यानंतर भरीत व्यवस्थित मिक्स करा आणि त्यात कोंथिबीर टाका. अशा प्रकारे तुमचं वांग्याचं भरीत तयार होईल. त्यानंतर तुम्ही हे भरीत बाजरीची किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता.

दरम्यान, महाराष्ट्र टुरिझम या ट्विटर अकाऊंटवरून निखाऱ्यावर भाजून बनवलेले चमचमीत मसालेदार वांग्याच्या भरीताचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक यूजर्संनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.